हिंगणी येथे मोरया गणेशोत्सवा समोर भारुडाचा कार्यक्रम

हिंगणी येथे मोरया गणेशोत्सवा समोर भारुडाचा कार्यक्रम

केत्तूर( अभय माने) मोरया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,हिंगणी (ता. करमाळा) यांच्या वतीने ह भ प सुधाकर महाराज गवळी भूम परांडा यांचा भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी तुला बुरगुंडा होईल या भारुडाने श्रोत्यांची मने जिंकली. समाज प्रबोधन करणारी भारुडे तसेच एकनाथी भारुड सादर करून गवळी महाराज यांनी वाहवा मिळवली.

हेही वाचा – केम येथील श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज मध्ये “आजची स्त्री-अबला नव्हे ,सबला” हा काव्य जागर कार्यक्रम संपन्न

उजनीच्या पाण्याचे पश्चिम भागातील शेतकऱ्यांकडून उत्साहात पूजन

मंडळाचे उपअध्यक्ष नागनाथ जाधव यांनी सुधाकर महाराज गवळी यांचा सन्मान केला.यावेळी शंकर जाधव भाऊसाहेब जाधव रामचंद्र जाधव सचिन मेजर संदीप बाबर संजय बाबर (गुरुजी) नंदकुमार जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते मंडळाचे अध्यक्ष संदेश जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line