*उन्हाचा तडाखा वाढतोय*
केत्तूर (अभय माने) गेल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस झाल्याने वातावरण ” थंड थंडा, कुल कुल ” झाले होते परंतु, पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने दुपारच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य होत आहेत. कमाल तापमानाने 40 अंश सेल्सिअस पर्यंत झेप घेतली आहे तर किमान तापमानातही मोठी वाढ होत असल्याने रात्रीही उकाडा बेचैन करीत आहे.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवण्यास सुरुवात झाली होती. मार्च महिन्यात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वातावरणात बदल झाला होता.त्यामुळे राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस व गारपीट झाली परंतु ते वातावरण आता पूर्णपणे निवळले आहे.
रमजान ईद च्या निमित्ताने कुंभेज मधे दिसून येतेय सामाजिक ऐक्य – दिग्विजय बागल
करमाळा तालुक्याचा पश्चिम भाग उजनीच्या लाभक्षेत्राचा बागायती भाग असूनही, उन्हाचा सर्वाधिक चटका या भागाला जाणवत आहे. उजनी जलाशयाचे पाण्याचे वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने उष्णतेच्या गरम झळा लाभक्षेत्राचा घाम काढत आहेत. वाढत्या उन्हामुळे पिके कोमेजून जात आहेत. पिकांना वारंवार पाणी देण्याशिवाय पर्याय नसल्याने शेतकऱ्यांची मोठी कसरत सुरू झाली आहे. एप्रिल व मे दरम्यान उन्हाची तीव्रता सर्वात जास्त जाणवणार आहे.