करमाळा तालुक्यात होणार २७८६३ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी; चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी साठी करू नका घाई; वाचा कृषी अधिकाऱ्यांनी आणखी काय सल्ला दिला?

करमाळा तालुक्यात होणार २७८६३ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी; चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी साठी करू नका घाई; वाचा कृषी अधिकाऱ्यांनी आणखी काय सल्ला दिला?

जेऊर(प्रतिनिधी)
करमाळा तालुक्‍यात आता खरीप पेरणीचा हंगाम जवळ येत असल्याने त्यासाठी आवश्‍यक पेरणीपूर्व मशागतीची कामे शेतकऱ्यांनी हाती घेतली आहेत सर्वत्र कामाची लगबग पाहण्यात येत आहे.

काहींनी बैलजोडीद्वारे तर उर्वरित ट्रॅक्‍टर आधारे मशागतीची कामे होत आहे.करमाळा तालुक्यात प्रामुख्याने उडीद, ज्वारी, तुर बाजरी मका या पिकांना प्राधान्य दिले जाते .मात्र पेरणी योग्य पाऊस (७५ ते ८० मि.मी.) झाल्यानंतर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण होतो व त्यानंतरच पेरणी करावी असे अवहान तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

अधिक बोलताना वाकडे यांनी सांगीतले की तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ५२१.७४ मि.मी. आहे. खरीपामध्ये एकूण २७८६३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षीत आहे. तालुक्यामध्ये खरीप हंगामासाठीचे पुरेसे बियाणे व खते उपलब्ध केली असल्याचे देखील वाकडे यांनी सांगीतले.

बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी सजग रहावे अधिकृत निविष्ठा विक्रेते यांचेकडूनच बियाणे, खते व औषधे खरेदी करावेत. खरेदी केलेल्या निविष्ठांचे पक्के बील घ्यावे. बॅगवरील किंमतीपेक्षा जादा रक्कम देऊ नये. बियाण्याची पिशवी, लेबल व बील जपून ठेवावे.

हेही वाचा – चार हजारांची लाच घेताना पोलीस हवालदाराला रंगेहात पकडले

करमाळा शहरात महाराणा प्रताप पुतळा सुशोभिकरण व रजपूत बांधव समाजमंदीर उभारण्यासाठी खासदार निधीची मागणी; खा.नाईक निंबाळकर यांना दिले निवेदन

बियाणे, खते व औषधे बाबत काही तक्रार असल्यास कृषि विभागाशी संपर्क साधावा तसेच पेरणी करताना बियाण्यास रासायनिक तसेच जैविक बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. रासायनिक खताचा जमीन आरोग्य पत्रिका, जमीन सुपिकता निर्देशांकानुसार संतुलित वापर करावा असे देखील तालुका कृषी अधिकारी, करमाळा श्री. संजय वाकडे यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांकडून पेरणी पुर्व हंगामाची मशागत अंतीम टप्प्यात असून खते बियाणे यासाठी लगबग सुरु आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line