हवेली तालुका गणित अध्यापक संघाच्या उपाध्यक्षपदी कोर्टीचे राहुलकुमार चव्हाण..
कोर्टी(प्रतिनिधी); महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ संलग्न पुणे जिल्हा गणित अध्यापक संघाच्या हवेली तालुकाध्यक्षपदी माध्यमिक आश्रम शाळा वाघोली विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक श्री.विजय फापाळे, उपाध्यक्षपदी न्यू इंग्लिश स्कूल खामगाव मावळ विद्यालयाचे गणिताचे अध्यापक श्री.राहुलकुमार चव्हाण तर सचिवपदी एच यु धोत्रे विद्यालयाचे श्री शरद जाधवर यांची निवड करण्यात आली.
लक्ष्मणराव आपटे प्रशाला पुणे येथे आयोजित गणित सहविचार सभेत आबासाहेब गोसावी विद्यालय वडगावचे मुख्याध्यापक मा. कल्याणराव बरडे व पुणे जिल्हा समन्वयक पुणे जिल्हा गणित अध्यापक संघाचे खजिनदार बीजेएस विद्यालयाचे मा. संदीप लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या सहविचार सभेत ही निवड करण्यात आली.
ज्येष्ठ भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन व गुरुवर्य पु ग वैद्य सर यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ श्री अ ल देशमुख सर ,डॉ श्री प्रदीप आगाशे सर, महाराष्ट्र गणित महामंडळाचे अध्यक्ष श्री सुनील श्रीवास्तव सर , गणित संशोधक लक्ष्मण गोगावले, यांनी सर्व गणित अध्यापकांना मार्गदर्शन केले.
पुणे जिल्हा गणित अध्यापक संघाचे नवनियुक्त अध्यक्ष श्री देविदास शिंदे सर यांनी प्रास्ताविकातून संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या पुणे टॅलेंट सर्च एक्झाम तसेच शिष्यवृत्ती आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षा बाबत सविस्तर माहिती दिली.
श्री भगवान पांडेकर सर यांनी पाहुण्यांचा परिचय तर श्री प्रदीप ठाकर सर यांनी पु ग वैद्य सरांच्या कार्याचा आढावा चित्रफितीच्या माध्यमातून घेतला .
पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री नंदकुमार सागर सर यांनी वैद्य सरांच्या कार्याचे स्मरण करून त्यांचे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी आता गणित शिक्षकांची आहे असे मत व्यक्त केले व मुख्याध्यापक संघाचे सर्वोतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही दिली .
विद्या महामंडळ संस्था पुणे चे अध्यक्ष श्रीराम रानडे यांनी अध्यक्षीय भाषणातून वैद्य सरांसोबतचे अनेक किस्से व अनुभव सांगितले .
यानंतर लक्ष्मणराव आपटे प्रशालेच्या प्राचार्या सौ मेधा सिन्नरकर, श्री.लीलाधर गाजरे, महामंडळाचे कार्यवाहक श्री शिवशरण बिराजदार यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
दुपारच्या सत्रामध्ये बालभारती पुणे येथील गणित विषयाच्या विशेष अधिकारी श्रीमती उज्ज्वला गोडबोले मॅडम यांनी गणिताची सध्याची पाठ्यपुस्तके व नवीन शैक्षणिक धोरणात येणारी पुस्तके याविषयी अध्यापकांना संबोधित केले .
यानंतर करिअर कौंसलर श्री भास्कर मुसळे सरांनी जेईई व नीट या परीक्षांसाठी शालेय पातळीवर विद्यार्थ्यांची तयारी कशा पद्धतीने करून घेता येईल , या परीक्षेचे कट ऑफ याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले .
त्यानंतर पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तालुका गणित अध्यापक संघातील अध्यक्ष ,सचिव व सर्व कार्यकारणी यांना गणित महामंडळाच्या वतीने नियुक्ती पत्रे देऊन सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भगवान पांडेकर सर व श्री कल्याण कडेकर सर यांनी केले .तर पुणे जिल्हा गणित अध्यापक संघाचे सचिव श्री
सचिन धनवट सर यांनी आभार मानले .
या कार्यक्रमास पुणे जिल्हा पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जिल्हाध्यक्ष तथा शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री मारुती कदम सर, जेष्ठ गणित शिक्षक भारत काळे सर, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री सुजित जगताप सर ,शिष्यवृत्ती तज्ज्ञ मार्गदर्शक श्री बोरसे सर,
माध्यमिक शिक्षक संघाचे श्री अशोकराव दरेकर सर, पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष, सचिव , सदस्य व गणित अध्यापक बंधू भगिनी बहुसंख्येने सुट्टी असूनही उपस्थित होते.
हवेली तालुका गणित अध्यापक संघ कार्यकारणी
अध्यक्ष:-श्री.विजय फापाळे
उपाध्यक्ष-श्री.राहुलकुमार चव्हाण.
सचिव -श्री शरद जाधवर.
सल्लागार-श्री आबासाहेब जाधव.( मुख्याध्यापक छत्रपती संभाजीराजे विद्यालय तुळापूर.)
सदस्य- अनंता दामगुडे,भरत जाधव,महादेव शिवरकर, शेख समीर जमाल.
Comment here