आरोग्यकरमाळा

दिवसभर उन्हाचा चटका अन् रात्री व पहाटे हुडहुडी: वातावरण बदलाने साथीच्या आजारांत वाढ; डॉक्टर म्हणतात..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दिवसभर उन्हाचा चटका अन् रात्री व पहाटे हुडहुडी: वातावरण बदलाने साथीच्या आजारांत वाढ; डॉक्टर म्हणतात..

केत्तूर (अभय माने) दिवाळीच्या एक दिवस अगोदर परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर लगेचच गुलाबी थंडीला सुरुवात झाली. सध्या दुपारी उन्हाचा चटका आणि रात्री व पहाटे चांगलीच हुडहुडी जाणवत आहे रात्रीच्या कमाल तापमानात घट होत आहे.

सध्या नोव्हेबर हिटचे वातावरण त्यामुळे जाणवत आहे .दिवसभर उन्हात चटका वाढल्यामुळे दिवसभर पंख्याची घर घर वाढली आहे तर रात्रीची ही घर घर बंद होत आहे.

ऋतू बदलाचा परिणाम आरोग्यावर

वातावरणातील बदलामुळे दम्याचे व श्वसनाचे विकार वाढत आहेत सध्या पहाटे व रात्री थंडी आणि दुपारी ऊन या वातावरणाचा परिणाम आजाराच्या ऋतुचक्रावरही झाला आहे त्यामुळे खोकला अंगदुखी घशाची विकार आदीचे रुग्ण वाढत आहेत.

“विषाणू वाढीसाठी हे वातावरण पोषक आहे त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी यासारखे रुग्ण वाढत आहेत. बदलत्या वातावरणामुळे होणारा खोकला आठ ते दहा दिवस राहत आहे लहान मुले व वृद्धांची काळजी घेणे गरजेचे आहे.

– डॉ. जिनेन्द्र दोभाडा, केत्तूर

litsbros

Comment here