*हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह*
केत्तूर (अभय माने ) करमाळा तालुक्यातील केत्तूर नं.2 (पारेवाडी रेल्वे स्टेशन) येथे हनुमान जयंती निमित्त हनुमान मंदिरात (बारा वर्षे)पहिल्या तपपूर्ती सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे बुधवार (ता.17) पासून आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहा दरम्यान सांप्रदायातील नामांकित व समाजाला प्रबोधन करणारे कीर्तनकार महाराज आपली कीर्तन सेवा करणार आहेत यामध्ये हभप नाना महाराज पांडुळे (दिवेगव्हाण),हभप पोपट महाराज कासारखेडकर (आळंदी),हभप समाधान महाराज भोजेकर (खानदेश),हभप ॲड.डॉ.बाबुराव महाराज हिरडे (करमाळा),हभप आकाश महाराज कामथे (जेजुरी),हभप गायनाचार्य माऊली महाराज झोळ (वाशिंबे),हभप गुरुवर्य कान्होबा महाराज देहूकर (पंढरपूर),हभप गुरुवर्य संदिपान महाराज शिंदे हासेगावकर यांची कीर्तन सेवा होणार आहे
सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे 4 ते 6 काकड आरती सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण दुपारी 11 ते 12 गाथा भजन दुपारी 1 ते 5 नामजप सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ सायंकाळी 7 ते 9 हरिकीर्तन तर रात्री 9 ते 10 जेवण व 11 नंतर हरिजागर असा कार्यक्रम होईल.
गावातील विविध मान्यवरांनी अन्नदानासाठी मागील वर्षीच आपल्या नावाची नोंद केली असून दररोज सकाळी नाष्टा, दुपारचे जेवण व संध्याकाळी कीर्तन सेवा संपल्यानंतर अन्नदान मोठ्या प्रमाणावर होणार आहे.यावेळी मृदंगाचार्य म्हणून हभप महेश महाराज येवले तर व्यासपीठ चालक म्हणून हभप कल्याण महाराज जाधवर (बार्शी) हे राहणार आहेत.
परिसरातील भाविकांनी कीर्तन सेवेचा व अन्नदानाचा लाभ घेण्याची आवाहन हनुमान मित्र मंडळ केत्तूर नं.2 (पारेवाडी रेल्वे स्टेशन) यांनी केले आहे.