महाराष्ट्रमाणुसकी

दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी, शिक्षणासासाठी ‘या’ आहेत शासनाच्या विविध योजना; गरजूंपर्यंत माहिती नक्की पोहोचवा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी, शिक्षणासासाठी ‘या’ आहेत शासनाच्या विविध योजना; गरजूंपर्यंत माहिती नक्की पोहोचवा

समाजातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तींकडे त्यांच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्यांकडे पाहून त्यांच्या मधील असलेले सुप्त सामर्थ्य विकसित करुन त्यांना समाज जीवनाच्या सर्व अंगामध्ये समान संधी, संपूर्ण सहभाग व त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय, तसेच इतर विविध विभागांमार्फत कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. यातील महत्वाच्या ३ योजनांची माहिती पाहुयात…

👉 स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना

योजनेचे स्वरुप –

● 18 ते 50 वयोगटातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिविकलांग अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी रु. 1,50,000/- च्या व्यवसायाकरीता 80% बँकेमार्फत कर्ज व 20% अथवा कमाल रु. 30,000/- अनुदान स्वरुपात दिले जाते.

अटी व शर्ती –

● अर्जदाराचे अपंगत्व किमान 40% त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
● अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असणे आवश्यक आहे.
लाभार्थी पुणे जिल्हयातील रहिवासी असावा.

संपर्क –

जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद

👉 अपंग व्यक्तींना एस.टी. प्रवास भाडयामध्ये प्रवास सवलत

योजनेचे स्वरुप

● अपंग व्यक्तींना दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे एस.टी. प्रवास भाडयामध्ये अपंग व्यक्तीस 75% व त्याच्या सोबत्यास 50% प्रवास सवलत देण्यात आली आहे.

अटी व शर्ती

● अपंगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सकाकडून प्राप्त केलेले असावे.
अपंगत्वाचे प्रमाण 40% हून अधिक असावे.
लाभार्थी पुणे जिल्हयातील रहिवासी असावा.

संपर्क

जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद

👉 अपंग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना

कर्ज मर्यादा –
• देशांतर्गत रुपये १० लाख
• परदेशात रुपये २० लाख
• वार्षिक व्याजदर : ४%
• महिलांना ३.५%
• कर्जपरतफेड : ७ वर्षे

अटी व शर्ती –

● लाभार्थी किमान ४०% अपंगत्व असलेला असावा.
● लाभार्थी किमान १५ वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
● लाभार्थ्याचे वय १८ ते ६० वर्षे असावे.
● कोणत्याही शासकीय यंत्रणेतून वित्तीय सहाय्य घेतले नाही याबाबत१००/- रु. स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र
● मागील परीक्षा उत्तीर्ण झाल्याबाबतच्या गुणपत्रिका
शिष्यवृत्ती अथवा शासनाकडून कोणतेही अर्थसाहाय्य मिळत असल्यास त्याबाबत तपशील द्यावा.
● अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्या बाबतचे प्रमाणपत्र (बोनाफाईड)

● लाभार्थ्यांचे सादर करावयाचे अभ्यासक्रमाला लागणाऱ्या खर्चाचे पत्रक
● लाभार्थींच्या वैयक्तिक बँक खात्याचे मागील सहा महिन्याचा लेखा जोखा असलेले
बँकद्वारा प्रमाणित केलेली स्वाक्षरी पडताळणी प्रमाणपत्र.

● पासपोर्ट/मतदानओळखपत्र/अधिवास अथवा रहिवासी दाखला (Domecile)
● पालकांचा उत्पन्न कर दाखला (मागील दोन वर्षाचा)
● उत्पन्ना बाबतचा दाखला (पगारपत्रक)
● स्थावरमालमत्ता बाबतचे विवरणपत्र (जमिनीचा ७/१२ खरेदीखत)

संपर्क –

राज्यातील सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत या महामंडळाचे कामकाज पाहण्यात येते. विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावा.

सदरील योजनेचे नियम वा अटी वा इतर तरतुदी यांमध्ये बहुतांशी बदल असू शकतात. या कारणास्तव वाचकांनी संबंधित विभागास भेट देऊन खात्री करून घ्यावी.

litsbros

Comment here