करमाळासोलापूर जिल्हा

हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त करमाळा येथे डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम फाउंडेशन तर्फे अन्नदान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त करमाळा येथे डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम फाउंडेशन तर्फे अन्नदान

करमाळा (प्रतिनिधी अलीम शेख); आज दिनांक दिनांक 28/09/2023 विश्वरत्न हजरत महंमद पैगंबर यांच्या जन्मोत्सव दिनाचे औचित्य साधून करमाळा शहरातील सामाजिक कार्य करणारी संघटना भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा यांच्या तर्फे श्रीराम प्रतिष्ठान करमाळा येथे ” अन्नदान वाटपाचा ” कार्यक्रम आमचे मार्गदर्शक व प्रसिद्ध उद्योजक दानशूर व्यक्तीमत्व युवकांचे आधारस्तंभ श्रेणिक शेठ खाटेर ( संस्थापक तपश्री प्रतिष्ठान करमाळा ) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्रेणिक शेठ खाटेर यांनी सांगितले की सामाजिक कार्य करताना आपण केलेले कार्य हे समाजात आपल्या विचारांचा, आपल्या वर्तनाचा, प्रभाव लोकांच्या मनात उमटत असतात इतर समाज किंवा व्यक्ती हे त्यांचा आदर्श घेतात ते ही चांगले विचार समाजात प्रसारण करण्याचा प्रयत्न करत असतात व त्याचेच प्रतिबिंब सामाजिक सलोख्यात, सामाजिक ऐक्य व एकात्मता कायम टिकून ठेवण्यासाठी मदत होते.करमाळा शहर आणि तालुक्यातील सर्वच सामाजिक संघटना चे काम उत्तम व चांगले आहे.

आज विश्वरत्न हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त अन्नदान वाटपाचा उपक्रम जो घेतला आहे तो कौतुकास्पद आहे कारण माणूस हा कोणत्या जाती धर्माचा आहे हे पाहिले जात नाही भुकेल्या ची भुक भागविणे, तहानलेल्या ची तहान भागविणे हेच खरे मानवधर्म जिवंत ठेवण्यासारखे आहेत.

गणेश चिवटे ( जिल्हा नियोजन समिती सदस्य सोलापूर ) यांच्या योग्य अशा नियोजनाने श्रीराम प्रतिष्ठान चा उपक्रम चालू आहे असे उपक्रम चालु ठेवणे या साठी प्रबळ इच्छा शक्ती व स्वच्छ नितीमत्ता असणे आवश्यक आहे.

करमाळा मुस्लीम समाजातील युवक या कामासाठी आपले तन मन धन सर्व काही लावुन समाजाचा नावलौकिक करत आहे अशा युवकांना आपण सर्व काही ताकत देणार आहे व यापुढेही सर्वांना सोबत घेऊन सामाजिक कामाची पालखी वाहणार आहे या कामासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले आहे.

हेही वाचा – उमरड जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी कोठावळे बिनविरोध; ‘हे’ आहेत इतर पदाधिकारी

दोनशे पेक्षा अधिक प्रवाशांनी तिकिटे काढली पण ती रेल्वे जेऊरला नीट थांबलीच नाही; जाता न आल्याने प्रवाशांना मनस्ताप व हाल

यावेळी सुरज शेख ( सचिव रहनुमा चॅरिटेबल ट्रस्ट ) रमजान बेग ( सचिव डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन ) आझाद भाई शेख ( उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करमाळा ),

जहाँ गीर बेग ( उपाध्यक्ष डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन ) जिशान भाईजी कबीर ( युवक नेते ) मुस्तकीम भाई पठाण ( उद्योजक ) ईमत्याज पठाण ( उपाध्यक्ष रहनुमा चॅरिटेबल ट्रस्ट )व महादेव भाऊ गोसावी ( व्यवस्थापक श्रीराम प्रतिष्ठान करमाळा ) व सकल करमाळा मुस्लीम समाजातील कार्यकर्ते उपस्थिती होते.

litsbros

Comment here