मोठी बातमी; ‘या’ आठ राज्यातील राज्यपाल बदलले; वाचा कोण नवे राज्यपाल.?
केंद्रातील मोदी सरकारच्या लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. अशातच मोदी सरकारने मोठा निर्णय घेत ८ राज्यांमध्ये नवीन राज्यपाल नियुक्त केले आहे. याबाबत राष्ट्रपती भवनाद्वारे एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.
कर्नाटक, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, गोवा, त्रिपुरा, झारखंड, हरियाणा आणि मिझोरम या राज्यांसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवीन राज्यपाल नेमले आहेत. यात अनेकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, तर अनेकांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
हरिभाऊ कंभमपती हे मिझोरामचे राज्यपाल असतील, मंगुभाई छगनभाई पटेल मध्य प्रदेशचे राजेंद्र विश्वनाथ अरलेकर यांना हिमाचल प्रदेशचा राज्यपाल करण्यात आलं आहे. मिझोरामचे राज्यपाल पीएस श्रीधरण पिल्लाई यांना गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्या त्रिपुराचे राज्यपाल असतील. त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस याना झारखंडची जबाबदारी देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंदारु दत्तात्रय यांना हरियाचे राज्यपाल करण्यात आले आहे. राष्ट्रपती कार्यालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
Comment here