ताज्या घडामोडी

सणासुदीत सोने महागले ; जाणून घ्या सध्याचा सोने-चांदीचा भाव

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सणासुदीत सोने महागले ; जाणून घ्या सध्याचा सोने-चांदीचा भाव

शारदीय नवरात्रोत्सव सुरु झाल्यापासून सोने चांदीमध्ये तेजी दिसून आली आहे. या काळात लग्नसराईच्या खरेदीसाठी ग्राहक बाजारात येत असल्याने सराफा व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी बाजार बंद होताना सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४७०१३ रुपयांवर बंद झाला. त्यात १८६ रुपयांची वाढ झाली. तत्पूर्वी सोन्याचा भाव ४७३७० रुपयांपर्यंत वाढला होता. एक किलो चांदीचा भाव ६१७९७ रुपयांपर्यंत वाढला.

त्यात ५३९ रुपयांची वाढ झाली. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार शुक्रवारी सोने ४६९८० रुपयांवर बंद झाले. चांदीचा भाव ६१०८० रुपये होता. सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज रविवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५९४० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ४६९४० रुपये आहे. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६०६० रुपये आहे.

२४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०२५० रुपये झाला आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४३९० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८४२० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६४०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९१०० रुपये आहे.

शेतकऱ्यांना सुवर्णसंधी ; ट्रॅक्टर खरेदीवर 50% अनुदान, शेतीची मशागत आता अधिक सुलभ


जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव १७७० डॉलरच्या आसपास आहे. चांदीचा भाव ०.२ टक्के घसरण झाली आणि चांदीचा भाव प्रती औंस २२.५५ डॉलर होता. गेल्या वर्षी करोन संकटाने सोने आणि चांदीमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढला होता. या काळात सोन्याचा प्रती भाव ५६२०० रुपयांवर गेला होता.

एकरकमी एफ आर पी हा शेतकरी राजाचा विजय आहे; FRP ही एकरकमीच मिळणार

उजनी धरण १००% च्या वर भरल्याने शेतकऱ्यांत आनंद; योग्य नियोजनाची गरज

करमाळा पोलिसांची अवैध गुटखा विक्री प्रकरणी ‘या’ गावात मोठी कारवाई; पोलिसात गुन्हा दाखल

litsbros

Comment here