सोने घ्यायचा विचार करताय तर नक्की वाचा; आज सोन्याच्या दरात मोठी घसरण; क्लिक करून वाचा आजचा दर
नवी दिल्लीः सोने-चांदीमध्ये गुंतवणूक (Gold Silver Price Today) करणार्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अमेरिकन डॉलरमध्ये मजबुती आणि बाँड यील्ड्समधील तेजीमुळे सोने कमकुवत झालेय. गुरुवारी जून वायदा सोन्याच्या किमती मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 0.31 टक्क्यांनी घसरल्या. त्याच वेळी एमसीएक्सवरील जुलै चांदीच्या वायदेच्या किमतीही 0.31 टक्क्यांनी घसरल्या. जागतिक स्तरावरील कमकुवत संकेतांमुळे गुरुवारी सोने 3 महिन्यांच्या उच्चांकावरून खाली घसरले.
सोन्याचा भाव-
एमसीएक्सवर व्यापारादरम्यान जून वायदा सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 153 रुपयांनी घसरून 48,521 रुपये झाला. मागील व्यापार सत्रात सोन्याची किंमत 10 ग्रॅमच्या 3 महिन्यांच्या उच्चांकी 48,700 रुपयांवर पोहोचली होती.
हेही वाचा- आता कोरोना टेस्टसाठी नाका-तोंडातील स्वॅबची गरज नाही; फक्त ‘या’ द्वारे करता येणार चाचणी
चांदीची किंमत-
त्याच वेळी एमसीएक्सवरील जुलै चांदीच्या फ्यूचर्सची किंमत 0.31 टक्क्यांनी म्हणजेच 224 रुपयांनी घसरून प्रतिकिलो 72,150 रुपये झाली.
सराफा बाजारात किंमत किती?
बुधवारी दिल्ली सराफा मार्केटमध्ये सोने-चांदीच्या किमतीत घसरण झाली होती. दिल्ली सराफा मार्केटमध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 97 रुपयांनी घसरून 47,853 रुपयांवर आला. त्याचबरोबर मंगळवारी तो प्रति 10 ग्रॅम 47,950 रुपयांवर बंद झाला. सोन्याप्रमाणेच चांदीतही घसरण नोंदवली गेलीय. एक किलो चांदीची किंमत 1,417 रुपयांनी कमी होऊन 71,815 रुपये झाली. मंगळवारी त्याची किंमत प्रति किलो 73,232 रुपये होती.
Comment here