घरोघरी प्राचीन परंपरेने तुळशी विवाहास सुरूवात

घरोघरी प्राचीन परंपरेने तुळशी विवाहास सुरूवात

केत्तूर (अभय माने) शुक्रवार (ता.24) पासून तुळशी विवाह मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे.ते सोमवार (ता. 27) नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे.हिंदू धर्मशास्त्र तुलशी विवाहाला अन्यन्यसाधारण महत्व असून ही प्राचीन परंपरा आहे ती आजच्या आधुनिक काळातही आबादित आहे.तुळशी विवाह करिता लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील आठवडी बाजारात महिलांची बोर फुले,चिंचा व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.

तुळशीला जसे धार्मिक महत्त्व आहे, तसेच आयुर्वेदात एक औषधी वनस्पती म्हणून देखील मोठे महत्त्व आहे.

तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी ही वधू तर बाळकृष्ण हा वर तर ऊस हा बाबा समजला जातो. बोर, चिंचही पूजा करताना आवर्जून वापरली जाते.

हेही वाचा – शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्या मकाई कारखान्याच्या सर्व संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी होणार बोंबाबोंब आंदोलन; प्रा.झोळ यांनी पाठवले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कृषी पदवीधर युवक नागनाथची किमया; करमाळा तालुक्यातील केम मध्ये लाल चुटुक स्ट्रॉबेरीचा प्रयोग यशस्वी!

या सोहळ्यासाठी तुळशी वृंदावन सारवून, रंगरंगोटी करून रांगोळी काढून सुशोभित केले जाते.तुळशी विवाह नंतर फटाक्याची आतषबाजी केली जाते व दिवाळीचा फराळ प्रसाद म्हणून दिला जातो.

छायाचित्र- तुळशी विवाह प्रसंगी

karmalamadhanews24: