करमाळासोलापूर जिल्हा

गायराण जमिनीवरील गोरगरिबांच्या घरांचे अतिक्रमण काढण्याच्या निर्णया विरोधात करमाळा रासप आक्रमक; तहसीलदारांना दिले निवेदन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

गायराण जमिनीवरील गोरगरिबांच्या घरांचे अतिक्रमण काढण्याच्या निर्णया विरोधात करमाळा रासप आक्रमक; तहसीलदारांना दिले निवेदन

करमाळा (प्रतिनिधी) ; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करमाळा तालुक्यातील गाव पातळीवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959कलम 53(2) नुसार काढण्यात येणार असल्यामुळे करमाळा तालुक्यासह महाराष्ट्राभर 31 डिसेंबर 2022 पुर्वी काढण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकार्यांनी ग्रामपंचायत विभागाला दिल्याने महाराष्ट्रातील गायरान जमिनीवरील दोन लाख तैवीस हजार क्षेत्रावरील राहात्या घरांसह जमिनीचे अतीक्रमण काढण्यास वेग आलेला आहे.

त्यामुळे तालुक्यातील अनेक गोरगरिबांची चालू राहात्या घरांसह कुटूंब उद्ध्वस्त होऊन उघड्यावर पडणार आहेत.या संदर्भातील निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब यांना पाठवण्यात आले.करमाळा नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी हे निवेदन स्वीकारले.

या निवेनाच्या प्रती ग्रामविकास मंत्री,जिल्हाधिकारी सोलापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, उप विभागीय कार्यालय,मा.तहसिलदार,गटविकास अधिकारी पंचायत समिती करमाळा यांना पाठवण्यात आल्या. या निवेदनाद्वारे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी म्हटले की, राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ लक्ष घालून सर्वोच्च न्यायालयात फिरविचार याचिका दाखल करून तो आदेश रद्द करून तात्काळ स्थगिती आणण्यात यावी.न्यालयाच्या आदेशामुळे अनेक कुटूंब उद्ध्वस्त होणार आहेत.

यामध्ये गोर-गरीब कष्टकरी मजुरांनी लाखो रुपये खर्च करून घरे बांधली आसून गायराण क्षेत्रातच शासकीय तिजोरीतून घरकुल, गटारी, पाण्याच्या टाक्या,पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन,विज सह शासकीय स्तरावरुन कोट्यावधी रुपये खर्च करून अनेक योजना राबवलेल्या आहेत.गायराण अतिक्रमणाची यादी संबंधित ग्रामपंचायमध्ये वाचन व लावली जात आसल्याने गावागावात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

त्यामुळे अनेक कुटूंब उघड्यावर पडणार आहेत.मुख्यमंत्री यांनी वेळीच लक्ष घालून गायराण वरील अतिक्रमण कढण्यात येणार आसल्याचा तो आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा.

अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशाने रासप पक्षाच्या वतीने तालुक्यासह राज्यभर तीव्र आंदोलन करणार आसल्याचा इशारा रासप जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

हेही वाचा – सावंत यांच्या भैरवनाथ साखर कारखान्यावर झाले ‘गेट बंद’ आंदोलन; आरोग्यमंत्री सावंत यांनी ऊसदर कोंडी फोडावी अशी मागणी

करमाळा तालुक्यातील हिंगणी येथे जमिनीच्या वादातून एकास जाळून मारले प्रकरणी बार्शी कोर्टाने ‘त्या’ तिघांचा जामीन फेटाळला

यावेळी रासप विधानसभा अध्यक्ष शंकर सुळ,ता. उपाध्यक्ष विठ्ठल भिसे,नेते बाळासाहेब टकले, संजय गांधी निराधार समितीचे माजी सदस्य नरेंद्रसिंह ठाकूर,डॉ.अमोल दूरंदे, सुहास ओहोळ,धनाजी लोखंडे,अर्जुन गाडे,यशवंत गायकवाड, विकास मेरगळ, रघुनाथ खटके, किरण पाटील, विठ्ठल खांडेकर, संजय गायकवाड मेजर, राजेंद्र सरतापे, बंडू माने,नानासाहेब पाटील,दादासाहेब ननवरे,राम धायतोंडे इत्यादी रासप कार्यकर्ते उपस्थितीत होते.

litsbros

Comment here