गुणवंतांचा सन्मान करून सैनिक संघटनेचा पेन्शन दिवस साजरा.

गुणवंतांचा सन्मान करून सैनिक संघटनेचा पेन्शन दिवस साजरा.

केतुर ( अभय माने ) आजी माजी सैनिक संघटनेचा पेन्शन दिवस पंचायत समिती हॉल करमाळा येथे उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हा सैनिक संघटनेचे व महाराष्ट्र राज्य त्रिदल सैनिक संघटनाचे अध्यक्ष अंकूश खोटे साहेब उपस्थित होते.
या समारंभप्रसंगी कमला भवानी शिक्षक पतसंस्था करमाळा चे चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल जातेगाव चे शहीद जवान पुत्र श्री विनोद वारे गुरुजी यांचा सन्मान करण्यात आला.


तसेच करमाळा तालुक्यातील जातेगावचे माजी सैनिक श्री हनुमंत शिंदे साहेब यांची कन्यĺ कुमारी स्नेहल शिंदे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत असिस्टंट को-ऑपरेटिव्ह ऑफिसर या पदावर निवड झाल्याबद्दल तिचा सन्मान करण्यात आला.
सर्व पेन्शनर सैनिकांनी या कार्यक्रमादरम्यान केक कापून पेन्शन दिवसाचा आनंद साजरा केला. याप्रसंगी आजी माजी सैनिक कल्याणकारी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री अक्रूर शिंदे साहेब यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा – टॅलेंट हंट तालुकास्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद पोथरे शाळेचा दबदबा

जेऊर येथील ओढा खोलीकरण कामासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे माजी आमदार पाटील यांनी केली मागणी

किरण ढेरे साहेब यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या समारंभासाठी करमाळा तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिक, वीर माता, वीर पिता , वीर पत्नी तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व समाननीय सदस्य उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line