करमाळासांस्कृतिक

तालुक्यात घरोघरी गणेश प्रतिष्ठापना उत्साहात : सोशल मीडियावर बाप्पाचीच धूम !

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

तालुक्यात घरोघरी गणेश प्रतिष्ठापना उत्साहात : सोशल मीडियावर बाप्पाचीच धूम !

केतूर (अभय माने) कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे तसेच प्रशासनाच्या नियम, अटी व शर्तीमुळे केतूर (ता.करमाळा) येथे व परिसरातील ग्रामीण भागात गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी सार्वजनिक गणेशोत्सवास ब्रेक लागला आहे. परिणामी घरगुती गणेशोत्सव मात्र मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत असून,आज शुक्रवार (ता. 10) रोजी घरोघरी श्री गणेश प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात करण्यात आली.श्री गणेशमूर्ती दुकानापासून ते घरापर्यंत काही नागरिकांनी हलगीचा कडकडाट तसेच गणपती बाप्पा मोरया चा जयघोष करीत वाजत गाजत घरी नेऊन श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

दुपारी दोन वाजेपर्यंत श्री गणेश प्रतिष्ठापनेसाठी मुहूर्त असल्याने बच्चेकंपनीचा उत्साह मात्र मोठा असल्याचे दिसून आले यावेळी बच्चेकंपनीची गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी सकाळपासूनच गडबड सुरू होती.

सोशल मीडियावर मात्र गणरायाचीच धूम…….

सर्वांचाच लाडका असणाऱ्या गणरायाचे आज आगमन होत असल्याने सर्वत्र जोश उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. याकाळात मित्रपरिवार, नातेवाईक यांना भेटणे शक्य नसल्याने सोशल मीडियावर व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर यासारख्या माध्यमातून सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात होत्या.

नेटकऱ्‍यानी श्री गणेशाचे फोटो एकमेकांना फॉरवर्ड केले असून, वेगवेगळे व्हिडिओ,स्टिकर्स, आरती संग्रह यामुळे सोशल मीडिया बाप्पामय झाला असून, गणेश भक्तीचा उत्साह मोबाईलमधून ओसांडून वाहत होता.

कोरोना महामारीला तोंड देत असताना कुटुंबातील एखादा सदस्य मृत पावला असल्याने अशा दुःखद प्रसंगी घरी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नाही.

कोरोना महामारीच्या संकटामुळे अनेकांचे उद्योग ,व्यवसाय , धंदे बसले होते.त्यामुळे अनेकांनी गणेशमूर्ती आणल्या होत्या.त्यामुळे बहुतांश जाण्याकडे गणेशमूर्ती विक्री अभावी शिल्लक राहिल्याचे दिसून आले.

litsbros

Comment here