गणेश चिवटे यांच्या शालेय साहित्य वाटपाने विद्यार्थ्यांचे चेहेरे फुलले
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश (भाऊ) चिवटे यांच्या संकल्पनेतून शालेय साहित्य वाटपाने फिसरे ता. करमाळा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे चेहेरे फुलले.नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी फिसरे येथील शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन उमेद व आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक भरतभाऊ आवताडे, सरपंच हनुमंत रोकडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण कणसे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी विद्यार्थ्यांना वह्या व इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे म्हणाले की, “विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध करून देणे ही काळाची गरज होती, सध्या पेरणीचे दिवस आहे, आपल्या भागात सर्वच शेतकरी वर्ग आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर बी बियाणे खते यांचा आर्थिक ताण आहे, या उपक्रमामुळे पालकांवरील आर्थिक भार कमी होवून वेळेची बचत होईल व विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सातत्य टिकून राहिल या उद्देशाने हा उपक्रम राबविला असल्याचे सांगितले.
पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या मुळे कोळगाव सबस्टेशनचा प्रश्न मार्गी – गणेश चिवटे
यावेळी रामभाऊ ढाणे ,नानासाहेब आवताडे, दादासाहेब चाळक, रामभाऊ खंडागळे,दशरथ निकम, ज्ञानेश्वर चाळक, धनंजय आवताडे ,नवनाथ चाळक, मोहन नेटके,विनोद नेटके ,शुभम नेटके, प्रमोद पाटील, ह.भ.प.अवताडे महाराज, सोमनाथ पाटील, जोतीराम आवताडे , नानासाहेब साबळे, सुमित आवताडे व ग्रामस्थ उपस्थित होते.