करमाळा

निरोप घ्या, गणपती बाप्पा: पुढच्या वर्षी लवकर या; तालुक्यात गणरायाला शांततेत निरोप

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

निरोप घ्या, गणपती बाप्पा: पुढच्या वर्षी लवकर या; तालुक्यात गणरायाला शांततेत निरोप

केतूर (अभय माने) दहा दिवसांच्या आनंदी, चैतन्यमयी अन् जल्लोषपूर्ण गणेशोत्सवानंतर ” गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ” च्या जयघोषात गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला.

गतवर्षी प्रमाणे याही वर्षी कोरोना महामार्गाच्या संकटामुळे सार्वजनिक गणेश मंडळाचे प्रमाण अत्यल्प असले तरी घरगुती बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळीही कोणताही थाटमाट, मिरवणुका, ढोल बाजा, आतषबाजी न करता अत्यंत साधेपणाने करण्यात आले. यावेळी कोरोनाचे संकट पूर्णपणे संपू दे ! अशी आर्त हाक घालत मूर्तीचे उजनी जलाशयाच्या विस्तीर्ण पाण्यामध्ये विसर्जन करण्यात आले.जड अंतःकरणाने गणेशभक्तांनी यावेळी गणरायाला निरोप दिला.

कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचे संकट डोक्यावर असले तरीही गणेशभक्तांचा उत्साह मात्र दरवर्षीसारखाच होता.

मोरया,मोरया गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात पंचक्रोशीतील गणेशभक्तांनी आपापल्या गाडी, दुचाकीवर तर काही जण स्वतः हातात,डोक्यावर गणेशमूर्ती घेत 82 % पाणीसाठा झालेल्या उजनी जलाशयाकडे मार्गस्थ होत होते.शासनाच्या नियमानुसार अतिशय साध्या पद्धतीने व तेवढ्यात शांततेत विसर्जन पार पडले.

सर्वच गणेशभक्तांनी शासनाच्या आदेशाचे पालन केल्याचे यावेळी दिसून आले.सोशल मीडिया मात्र सकाळपासूनच गणेश विसर्जनामुळे गणेशभक्त मय झाला होता.श्री गणेश विसर्जनानंतर नवरात्रोत्सवाचे वेध मात्र सर्वांना लागले आहेत.

छायाचित्र- केतूर : उजनी जलाशयाच्या अथांग पाण्यात गणेश विसर्जन करताना गणेश भक्त.
(छायाचित्र; अभय माने,केत्तूर)

litsbros

Comment here