माढा तालुक्याच्या अस्मितेसाठी आमदार बबनदादा व मी एकत्र आलोय – प्रा.शिवाजीराव सावंत अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांच्या प्रचारार्थ मानेगाव व उंदरगाव येथे सभा

माढा तालुक्याच्या अस्मितेसाठी आमदार बबनदादा व मी एकत्र आलोय – प्रा.शिवाजीराव सावंत

अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांच्या प्रचारार्थ मानेगाव व उंदरगाव येथे सभा

माढा /प्रतिनिधी-(राजेंद्र गुंड)
या विधानसभा निवडणुकीत आमदार शिंदे गट व सावंत गट एकत्र येणे विरोधकांना रुचले नाही.आम्ही दोन्ही गट एकत्र आल्याने रणजीत शिंदेच आमदार होणार हे नक्की झाले आहे त्यामुळे आता दुसऱ्या कोणाचीही डाळ शिजणार नाही.विरोधी उमेदवाराच्या खांद्यावर बसून बाहेरच्या तालुक्यातील शक्ती माढा तालुक्यात येऊ पाहतेय.हे बाहेरच्या आक्रमण व तालुक्याच्या अस्मितेसाठी आम्ही दोन्ही गट विचारपूर्वक एकत्र आलो आहोत.मी आ.बबनदादा एकमेकांच्या विरोधात लढलो हे जरी खरे असले तरी जेंव्हा-जेंव्हा बाहेरच्या तालुक्यातील राजकीय आक्रमण येईल तेंव्हा-तेंव्हा ते रोखण्यासाठी आम्ही निर्णय घेतले आहेत. माढा तालुक्याच्या विकासाचे निर्णय जर अकलूजमधून होणार असतील तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. विरोधकांना पुन्हा निवडणूक लढविण्याची तलफ झाली नाही पाहिजे अशा विक्रमी मतांनी अपक्ष उमेदवार रणजीत बबनराव शिंदे यांना मतदान करण्याचे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांनी केले आहे.

ते मानेगाव व उंदरगाव ता.माढा येथे विधानसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांच्या प्रचारार्थ विराट सभेत मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी बोलत होते.

यावेळी समाजकल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे म्हणाले की,नुसते डिजिटल बोर्ड लावून आमदार होता येत नसते. आमदार होण्यासाठी शेतकरी, सर्वसामान्य जनता व गोरगरिबांची कामे करावी लागतात हे कदाचित विरोधी उमेदवारला माहीत नसल्याचा टोला त्यांनी लगावला.आमदार शिंदे यांच्यामुळे माढा तालुक्यात तीन ठिकाणी एमआयडीसी व पाच साखर कारखाने सुरू झाले आहेत.हे राज्यातील एकमेव उदाहरण आहे.जे स्वतःला राज्याचे नेते व माढा तालुक्यात अतिक्रमण करु इच्छित आहेत त्यांच्या माळशिरस तालुक्यात एकही एमआयडीसी नाही.त्यांच्या साखर कारखान्याने सातत्याने गोरगरीब शेतकऱ्यांची लूट केली आहे.त्यांनी कधीच विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याएवढा दर दिला नाही ही वस्तुस्थिती आहे.वाळू उपसा करणाऱ्यांच्या हाती मतदारसंघ न देता विकासकामांचा डोंगर उभा करणाऱ्या आ.बबनराव शिंदे यांच्या रणजीत शिंदे या कर्तबगार मुलाला विधानसभेत पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले.

“तर मी राजकारणातून संन्यास घेईन” – आ.बबनराव शिंदे – विरोधकांकडे विकासकामाचा कसलाही अजेंडा नसल्यामुळे ते नुसता खोटा प्रचार व थापा मारून जनतेची दिशाभूल करत आहेत.पंढरपूरचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद करण्यासाठी जिल्हात जर माझ्या उपस्थितीत साखर कारखानदारांची मिटिंग झाली असे विरोधी उमेदवार अपप्रचार करीत आहेत.जर अशी मिटिंग झाल्याचे त्यांनी पुराव्यासह सिद्ध केले तर मी राजकारणातून संन्यास घेतो असे सभेत त्यांनी खुले आव्हान दिले.शासनाची तत्वतः अंतिम मंजुरी मिळालेल्या खैराव-मानेगाव उपसासिंचन योजनेची टेंडर प्रक्रिया सुरू होणार आहे.प्रा.शिवाजीराव सावंत गट, प्रहार शेतकरी संघटना,रयत क्रांती संघटना, शिवाजी कांबळे यांनी रणजीत शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे त्यामुळे विजयासाठी कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही.23 नोव्हेंबर रोजी गुलाल आपणच उधळणार आहोत.रणजीत शिंदे यांचे सफरचंद हे चिन्ह घरोघरी जाऊन प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा – माढा मतदारसंघातील जलसिंचन,वीज,रस्ते व ऊस गाळपाचे प्रश्न मार्गी लावले -आ. बबनराव शिंदे अपक्ष उमेदवार रणजीत बबनराव शिंदे यांच्या प्रचारार्थ दौरा

सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील करमाळा तालुक्यातील डिकसळ चेक पोस्टवर वाहनांची कसून तपासणी

या दोन्ही ठिकाणच्या सभेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील, माढेश्वरी बँकेचे व्हा.चेअरमन अशोक लुणावत,दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे,माजी सभापती शिवाजी कांबळे, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक अमोल चव्हाण, निलकंठ पाटील,संदीप पाटील, सुभाष नागटिळक,उल्हास राऊत,हनुमंत चौधरी,रयत क्रांतीचे प्रा.सुहास पाटील, शिवसेनेचे मुन्ना साठे,हनुमंत पाडूळे,गणेश काशीद,बाबा चव्हाण,अशोक चव्हाण,विद्या पाटील,लक्ष्मण देशमुख,पंडित पाटील,विलास कदम,औदुंबर देशमुख,बाबा शेळके,अमर बडेकर,हरीश कारंडे,तानाजी देशमुख,महेश पाटील,बिरूदेव शेळके,शरद नागटिळक, आप्पाराव वाघमोडे,अरविंद नाईकवाडे,पंढरपूरचे मारुती जाधव,सरपंच तानाजी लांडगे, अशोक शिंदे,रमेश भोईटे,राजेंद्र खोत,संतोष लोंढे,बाळू इंगळे, बाबा पारडे,शिवाजी बारबोले, कुमार शिंदे,भगवान लटके, मार्तंड जगताप,रमाकांत कुलकर्णी,ज्ञानेश्वर पाटील, रोहिदास कापसे,रवींद्र चव्हाण, राजाभाऊ भोगे,सूरज पाटील, वैजिनाथ व्हळगळ,नवनाथ तांबिले,सुधीर मस्के,विश्वनाथ पारडे,सिद्धेश्वर राऊत,शिवाजी भोगे,माणकोजी भुसारे,मदन आलदर,निलेश भोसले,महेश चव्हाण,बालाजी नाईकवाडे, चंद्रकांत व्हनमाने,भारत भांगे, आण्णा मस्के,भारत लटके, राजाभाऊ पाटील,विनायक चौगुले,यासीन शेख,इंद्रनील क्षीरसागर,धनाजी सुतार,पिंटू नागटिळक,बाबा वाघमोडे यांच्यासह गावोगावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य,साखर कारखाने, जिल्हा दूध संघ,माढेश्वरी अर्बन व जिल्हा मध्यवर्ती बँक,मार्केट कमिटी,खरेदी विक्री संघाचे आजी-माजी संचालक यांच्यासह शेतकरी,ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळी- मानेगाव ता.माढा येथे अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना शिवसेनेचे प्रा. शिवाजीराव सावंत बाजूला आमदार बबनराव शिंदे व समोर उपस्थित जनसमुदाय.

karmalamadhanews24: