म्हणून फारूक जमादार यांचे करमाळा नगरपरिषदे विरुद्धचे उपोषण अखेर मागे; वाचा सविस्तर

म्हणून फारूक जमादार यांचे करमाळा नगरपरिषदे विरुद्धचे उपोषण अखेर मागे; वाचा सविस्तर

करमाळा(प्रतिनिधी); करमाळा नगर परिषदेतील आरोग्य विभागातील साफसफाई स्वच्छता करणारा ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फारुक जमादार हे सात जुन रोजी सकाळी अकरा वाजता उपोषणास बसणार होते.

परंतु मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी जमादार यांना ठेकेदारावर योग्य ती दंडात्मक कार्यवाही करू असे लेखी आश्वासन दिले यावेळी करमाळा नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिक्षक बदे यांनी पत्र दिल्या नंतर उपोषण तात्पुरत्या स्वरूपात माघे घेत असल्याचे जमादार यांनी सांगीतले

यावेळी बोलताना जमादार म्हणाले की, मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी आरोग्य विभागातील साफसफाई स्वच्छता करणारा ठेकेदारावर दंडात्मक कार्यवाही करू असे लेखी आश्वासन दिले आहे.

हेही वाचा – पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या ब्रिटिश कालीन कोंढार चिंचोली डिकसळ पुलाची निविदा अंतिम; आ.संजय मामा शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

अकरा गुन्हात आरोपी असणाऱ्या अट्टल गुन्हेगारास करमाळा येथून अटक; ५ लाखाचे दागिने ही हस्तगत, सोलापूर ग्रामीण यांची धडाकेबाज कामगिरी

त्यामुळे मी सात जुन रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेले उपोषण तात्पुरत्या स्वरूपात माघे घेतले आहें परंतु ठेकेदाराच्या गैरकारभाराविरुध्द लढा कायम राहील असे ते यावेळी म्हणाले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line