सदगुरु कृषी महाविद्यालय,मिरजगाव येथील कृषीदुतांनी केत्तूर नं २ येथील शेतकऱ्यांना दिले आधुनिक शेती विषयक धडे

सदगुरु कृषी महाविद्यालय,मिरजगाव येथील कृषीदुतांनी केत्तूर नं २ येथील शेतकऱ्यांना दिले आधुनिक शेती विषयक धडे

केत्तूर ( अभय माने) महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न सदगुरु कृषी महाविद्यालय,मिरजगाव (ता.कर्जत) येथील कृषी दुतांनी केत्तूरनं.2 (ता.करमाळा) येथील शेतकऱ्यांना ग्रामीण जागरूकता कार्यक्रमांतर्गत सेंद्रिय शेती बाबत महत्त्व पटवून दिले व वरचेवर शेतीमध्ये अतिरिक्त होणारा रसायनांचा वापर वाढला आहे हे प्रकर्षाने दिसून येत आहे मानवी जीवनावर त्याचा होणारा परिणाम त्याबरोबर शेतीचीही सुपीकता कमी आहे हे लक्षात घेऊन कृषीदूत सुरज लांडे, शिवराज तावरे, राजवर्धन विभुते, विशाल विभूते, प्रतिक तरंगे, हनुमंत वाघमोडे यांनी याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला कृषि दुतांना संस्थेचे संस्थापक डॉ. शंकरराव नेवसे,अध्यक्षा कल्याणीताई नेवसे, सचिव राजेंद्र गोरे, प्रशासन अधिकारी सखाराम राजळे, समन्वयक प्रा. सुरज जाधव,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे, कार्यक्रम अधिकारी प्रा.यादव एस.व्ही,काळे एस.बी.तसेच सर्व प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line