करमाळामनोरंजनमहाराष्ट्र

‘फॅण्ड्री’तला जेऊरकर जब्याचा येतोय नवा चित्रपट; सोबतच सैराट फेम सल्या आणि तानाजी दिसणार नव्या रुपात

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जेऊरकर ‘फॅण्ड्री’ तल्या जब्याचा येतोय नवा चित्रपट; फँड्री नंतर पहिल्यांदाच दिसणार नव्या रुपात

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा २०१३ साली प्रदर्शित झालेला ‘फॅण्ड्री’ हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. या चित्रपटात अभिनेता सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात या दोघांनी मुख्य भूमिका साकारली होती.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. मात्र, या चित्रपटानंतर सोमनाथ अवघडे फारसा कुठे झळकला नाही. परंतु, सोमनाथ लवकरच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

‘फ्री हिट दणका’ या आगामी मराठी चित्रपटात सोमनाथ झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तो पहिल्यांदाच एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

अलिकडेच या चित्रपटातील सोमनाथचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. यात सोमनाथच्या हातात बॅट दिसून येत आहे. त्यामुळे सोमनाथला या नव्या रुपात पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

दरम्यान, ‘फ्री हिट दणका’ हा चित्रपट १६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून यात सोमनाथसोबत अभिनेत्री अपूर्वा एस. ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

तर अरबाज आणि तानाजी ही सैराटमधील मित्रांची जोडीदेखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुनिल मगरे यांनी केलं आहे.

हेही वाचा- शेतकऱ्यांना मिळणार ‘ एवढ्या ‘ लाखाचे बिनव्याजी पीककर्ज;महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

उजनी धरण झपाट्याने होतेय रिकामे; आता उरले ‘इतके’ पाणी; वाचा आजची स्थिती व सविस्तर आकडेवारीसह.

तर, निर्मिती अतुल तरडे आणि आकाश ठोंबरे, मेघनाथ सोरखडे यांनी केली आहे.

litsbros

Comment here