करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

फक्त महिलांनीच साजरी केली सावित्रीबाई फुले यांची जयंती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

फक्त महिलांनीच साजरी केली सावित्रीबाई फुले यांची जयंती

केतुर ( अभय माने ) येथील नेताजी सुभाष विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिलांनीच मिळून मोठ्या उत्साहात साजरी केली.

माजी सरपंच सौ.सुवर्णा निकम या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या, तर प्रहार जनशक्ती संघटनेच्या महिला तालुका आघाडी प्रमुख सौ.दिपालीताई डिरे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
सौ.निकम यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी विद्यालयातील ओम निंभोरे, प्रतीक नवले, नैतिक जरांडे, अपूर्वा शिंदे, कुमारी खारतोडे,कुमारी खाटमोडे व इंग्रजी माध्यमातील दुसरीच्या वर्गातील काही विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाला माजी सरपंच सौ. निर्जलाताई नवले, ग्रामपंचायत सदस्या सौ.सुप्रिया जरांडे, ग्रामपंचायत सदस्या सौ. कावेरी नगरे, सौ.सुवर्णा निकम, सौ. दिपाली डिरे सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.

हेही वाचा – करमाळा नगरपालिका हद्दीतील 450 घरे नियमित करण्याचा प्रस्ताव तात्काळ मंत्रालयात पाठवा; प्रांताधिकारी ज्योतीताई कदम यांना आदेश!

वाशिंबे येथील उच्च शिक्षित वकील तरुणाने साडेतीन एकरात घेतले बावीस लाखाचे उत्पन्न; वाचा जिद्दीची कहाणी

कार्यक्रमाचे प्रास्ताविक के.सी.जाधवर यांनी केले, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.डी मदने यांनी स्वागत केले. सहशिक्षिका सौ. प्रियांका साळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर सहशिक्षिका सौ.अश्विनी पवार यांनी आभार मानले.

शाळेचे मुख्याध्यापक डी.ए.मुलाणी व पर्यवेक्षक बी.जी.बुरुटे यांनी मार्गदर्शन केले.

litsbros

Comment here