कारखान्यांनी उसाची बिल लवकर द्यावे

*कारखान्यांनी उसाची बिल लवकर द्यावे*

केत्तूर ( अभय माने) करमाळा तालुक्यातील हक्काचे साखर कारखाने यावर्षी धुराडी पेटली नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इतर कारखान्याकडे ऊस नेण्यासाठी करावी लागत आहे त्यातच या वर्षी कारखाने उशिराने सुरू झालेली ऊसतोड करणाऱ्या गोळ्या कमी प्रमाणात आहेत त्यामुळे उजनीला क्षेत्र परिसरात ऊसतोड संत गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.

ऊसतोड कामगार अल्प प्रमाणात आल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. दरवर्षी ऊस तोडणी हंगाम सुरू झाल्याबरोबर ऊस मजुरांच्या टोळ्या मोठ्या संख्येने येतात व त्यामुळे बाजारपेठ गजबळून जाते परंतु या वर्षी तशी परिस्थिती नाही.त्यामुळे ग्रामीण भागातील बाजारपेठेतही शुकशुकाट दिसून येत आहे.

हेही वाचा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर करमाळ्यात आले होते, त्या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी करमाळा शहरात विशेष कार्यक्रम आयोजित करणार: मंगेश चिवटे

140 कोटी रुपये खर्च करून केलेल्या रस्त्याची वाशिंबे चौफूला दरम्यान 4 किमी साईड पट्टी उकरली

” उजनी लाभक्षेत्र परिसरातील शेतकऱ्यांचा प्रामुख्याने व्यवसाय म्हणजे शेती आणि शेतीमधील जास्तीत जास्त ऊस या पिकावर अवलंबून असणारा शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह व उजनी काठावरील शेतकऱ्यांचा ऊस बारामती ॲग्रो श्री अंबालिका, गौरी शुगर हिरडगाव , दौंड शुगर या प्रमुख कारखान्यांना जात आहे. पोटच्या पोरासमान जपलेल ऊस हे पीक आज कारखान्याला तुटून जाऊन एक महिना उलटला तरीही कारखानदारांनी अजूनही ऊस बिलाचा दर जाहीर केला नाही व गाळप झालेल्या उसाचे शेतकऱ्यांना एकही रुपया दिला गेलेला नाही. तरी शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसबिलाचे पैसे लवकर देण्यात यावेत.
– करण विठ्ठल निकम.केत्तूर (भाजपा युवा किसान मोर्चा सचिव करमाळा तालुका)

karmalamadhanews24: