अखेर ‘ही’ एक्सप्रेस उद्यापासून पारेवाडी स्थानकावर थांबणार; ग्रामस्थांच्या मागणीला यश

अखेर ‘ही’ एक्सप्रेस उद्यापासून पारेवाडी स्थानकावर थांबणार; ग्रामस्थांच्या मागणीला यश

केत्तूर ( अभय माने) पुणे – हरंगुळ – पुणे या रेल्वे गाडीला पारेवाडी (ता.करमाळा) रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आल्याचे रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात जाहीर करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आज गुरुवार (ता. 14) पासून गाडी क्रमांक 01487 / 01488 पुणे – हरंगुळ – पुणे या विशेष रेल्वे गाडीला थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

ही रेल्वे गाडी 01487 पुणे – हरगुंळ पारेवाडी स्थानकावर सकाळी 8.08 वा. पोहोचेल व 8.10 मिनिटांनी हरगुंळकडे सुटेल. 01488 हरंगुळ – पुणे पारेवाडी स्थानकावर संध्याकाळी 6.23 वा. पोहोचेल व 6.25 वा. पुण्याकडे सुटेल असे सांगण्यात आले आहे.

पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा यासाठी पारेवाडी व परिसरातील ग्रामस्थांचा 1996 पासून संघर्ष सुरू आहे.रेल्वे थांब्यासाठी रेल रोको व तसेच एल्गार मोर्चाही काढण्यात आला होता. परिसरातील प्रवाशांची चेन्नई एक्स्प्रेसला थांबा मिळावा अशी मागणी असताना,आता हरंगुळ – पुणे या गाडीला थांबा मिळत असल्याने प्रवाशातून समाधान व्यक्त केले जात आहे.लवकरच चेन्नई एक्सप्रेस थांबा मिळेल अशी आश्वासन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले आहे.

हेही वाचा – कौशल्या मधुकर गुंडगिरे यांची पारेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड

करमाळा येथील रुबीना मुलाणी यांना सोलापूर जिल्हा परिषदेचा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते महिला दिनाच्या पूर्व संध्येला झाला सन्मान

करमाळा तालुका असा आहे की, या तालुक्यात मध्य रेल्वेची तब्बल 7 रेल्वे स्थानके आहेत.(जिंती, पारेवाडी, वाशिंबे, पोफळज, जेऊर, ढवळस, केम ) आहेत परंतु, जेऊर व केम या रेल्वे स्थानकावरच फक्त एक्सप्रेस गाड्याना थांबा आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line