तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे करमाळा येथे आयोजन; शिक्षणाधिकारी सोलापूर यांचे हस्ते होणार पारितोषिक वितरण

तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे करमाळा येथे आयोजन; शिक्षणाधिकारी सोलापूर यांचे हस्ते होणार पारितोषिक वितरण

करमाळा (प्रतिनिधी);
यशकत्याणी सेवाभावी संस्था, शिक्षण विभाग पंचायत समिती करमाळा व इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा गुरुवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी घेण्यात येणार आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषण कौशल्य विकसित व्हावे व त्यांच्या व्यावहारिक जीवनातआत्मविश्वासाने इंग्रजी बोलण्याचे धाडस निर्माण व्हावे या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

यशकल्याणी सेवाभवन गिरधरदास देवी विद्यालय करमाळा या ठिकाणी ही स्पर्धा घेतली जाणार आहे. यासाठी तज्ञ परीक्षक म्हणून माढा ,परांडा ,कर्जत व बार्शी येथील शिक्षक काम पाहणार आहेत. ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेतली जाणार आहे. पहिला गट – इ.पाचवी, सहावी, दूसरा गट इ सातवी ,आठवी तर तिसरा गट इ. नववी , दहावी चा असेल.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभाचे दिवशी दू.2.00 वा. यशकल्याणी सेवाभवन येथे प्रा. गणेश करे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या कार्यक्रमास सोलापूरच्या माध्य. शिक्षणाधिकारी डॉ. तृप्ती अंधारे तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.संजय जावीर, गटशिक्षण अधिकारी श्री.राजकुमार पाटील, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ. बाबुराव हिरडे, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पत्रकार बांधवांचीही या समारंभास उपस्थिती असणार आहे .

स्पर्धा विजेत्यांना यशकल्याणी परिवाराच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रासह रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

हेही वाचा – करमाळा तालुक्यातील ‘या’ 2 गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह या 5 उपकेंद्रांच्या पद निर्मितीला मान्यता; आ.संजयमामा शिंदे यांची माहिती

विनापरवाना मुरूम उचलणाऱ्या करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायतीची चौकशी करा; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

यशकल्याणी सेवाभावी संस्थेसह, पं.स. शिक्षण विभाग, व इंग्लीश टीचर्स असोसिएशन द्वारे विद्यार्थी व्यक्तीमत्व विकासासाठी करमाळा तालुक्यात हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून यापुढेही अशा शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल असे ,इंग्लीश टीचर्स असोसिएशनचे प्रमुख सल्लागार, यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. करे-पाटील यांनी सांगितले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line