नेताजी सुभाष विद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांचे यश

नेताजी सुभाष विद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांचे यश

  

केत्तूर (अभय माने): नेताजी सुभाष ,केत्तूर (ता.करमाळा) येथील शिक्षक व विद्यार्थी यांनी शालाबाह्य विविध स्पर्धेत यश संपादन केले.यशस्वी शिक्षक व विद्यार्थी पुढील प्रमाणे- बारामती येथील क्रिएटिव्ह अँकॅडमी, बारामती तर्फे विद्यार्थ्यांसाठी इयत्ता अकरावी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात आली. यात या शाळेचे दोन विद्यार्थी अनुक्रमे त्रिवेणी नवनाथ देवकते (इयत्ता दहावी,प्रथम रॅक) व हर्षवर्धन नागनाथ पांढरे (इयत्ता दहावी तृतीय रँक) यांना रोख 2000 व 1000 रुपये देण्यात आले.

 

 त्याचबरोबर करमाळा तालुकास्तरीय होम मिनिस्टर स्पर्धेत याच शाळेतील विवेकानंद न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका सुषमा कोकणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यांना प्रथम क्रमांकासाठी असणारी स्कुटी मोटरसायकल बक्षीस मिळाले.

 

 याचबरोबर श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर येथे संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थांतर्गत शिक्षकांसाठी अभय चषक क्रिकेट स्पर्धा कोल्हापूर येथे घेण्यात आल्या, यात सहभागी शाळेचे सहशिक्षक संदीप मोहनराव हिरवे यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पारितोषिक देण्यात आले.

 

 सर्वांना शाळेचे प्राचार्य डी.ए मुलांणी सर पर्यवेक्षक बि.जी. बुरुटे सर व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. विद्यालयाच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला.

 

छायाचित्र- केत्तूर :यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांचा सन्मान करताना मान्यवर

karmalamadhanews24: