करमाळा

केम केंद्राची शिक्षण पारिषद मोठ्या उत्साहात संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम केंद्राची शिक्षण पारिषद मोठ्या उत्साहात संपन्न

केम (प्रतिनिधी) ; शिक्षण अधिकारी यांच्या आदेशानुसार केम केंद्राची राजाभाऊ तळेकर विधालमात संपन्न झाली .

सुरुवातीला शिक्षण परिषदेचे उद्घाटन स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीमाईंच्या प्रतिमेचे पूजन करून खालील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले .श्री विष्णू कदम सर- मुख्याध्यापक श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम. मनोज तळेकर सर- मुख्याध्यापक राजाभाऊ तळेकर विद्यालय. धनंजय खंडाळे सर -माजी मुख्याध्यापक शा गो पवार विद्यालय.

नागनाथ तळेकर सर -मुख्याध्यापक शिवाजी प्राथमिक विद्यालय व सरपंच केम . रामचंद्र देशमुख सर -उपमुख्याध्यापक राजाभाऊ तळेकर विद्यालय केम .भाऊराव तळेकर सर -केंद्रीय मुख्याध्याप केम व महेश्वर कांबळे- केंद्रप्रमुख . उद्घघाटनानंतर राजाभाऊ तळेकर विद्यालय व शिवाजी प्राथमिक विद्यालय चे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजी बापू तळेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

आश्रम शाळेचे शिक्षक हरिचंद्र साळुंके सर यांच्या आई- कमल साळुंके .खानटवस्ती चे मुख्याध्यापक आयुब मोमिन यांचे वडील – युसूफ मोमीन,व पाथुर्डी शाळेचे माजी मुख्याध्यापक -शिवाजी तळेकर गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहून पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .

शिक्षण परिषदेमध्ये देशमुख सर – राजाभाऊ हायस्कूल विद्यालय केम यांनी आपल्या विद्यालयात राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली . NAS सर्वे बाबत मराठी विषयांमध्ये -श्रीमती राणी सातव मॅडम मलवडी . गणित विषय- श्री जगताप सर आश्रम शाळा व माधुरी चव्हाण मॅडम केंद्र शाळा केम. परिसर अभ्यास विषय – श्री सतीश कळसाईत बिचितकर वस्ती -1 यांनी माहिती सांगितली.

करमाळा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी -मा. अनिल बदे साहेब यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. मार्गदर्शना मध्ये साहेबांनी शिक्षकांनी आपल्या वैयक्तिक शारीरिक आरोग्याविषयी लक्ष देण्याविषयी मार्गदर्शन केले .विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याचे शिक्षकांना आवाहन केले .

दुसऱ्या सत्रामध्ये Read to me app इन्स्टॉल कसे करायचे याविषयी निंभोरे शाळेचे- प्रताप भोसले सर यांनी माहिती दिली. शाळा व्यवस्थापन समिती याविषयी केंद्रीय मुख्याध्यापक श्री भाऊराव तळेकर सर यांनी मार्गदर्शन केले.

स्वच्छ शाळा सुंदर शाळा अंतर्गत केंद्रामध्ये चांगले काम केल्यामुळे फरतडे वस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री अरुण चौगुले सर व राम काळे सर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विश्वकर्मा फाउंडेशन चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार केंद्रातील श्री सतीश कळसाईत सर यांना मिळाल्याबद्दल त्यांचाही केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला.

ऑनलाइन/ ऑफलाइन शिक्षण .स्वच्छ शाळा सुंदर शाळा विविध कामे या विषयी केंद्रप्रमुख यांनी माहिती सांगितली. परिषदेसाठी केंद्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, खाजगी शाळांचे 77 शिक्षक, शिक्षिका हजर होते. केंद्रशाळा केम चे तुकाराम तळेकर सर यांनी सर्वांचे आभार मानून आपल्या अमोघ वाणीने परिषदेची सांगता करण्यात आली.

litsbros

Comment here