करमाळा

भारत महाविद्यालय जेऊर येथे ऑनलाइन आंतरराष्ट्रीय वेबीनार संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

भारत महाविद्यालय जेऊर येथे ऑनलाइन आंतरराष्ट्रीय वेबीनार संपन्न

करमाळा (प्रतिनिधी); भारत महाविद्यालय जेऊर तालुका करमाळा (म.रेल) ,केरल हिंदी साहित्य अकादमी ‘तिरुवतपुरम , इण्डो यूरोपियन लिटरेरी डिस्कोर्स यूक्रेन व गिनादेवी शोध संस्थान ,भिवानी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भारतीय संत साहित्य : विविध आयाम ‘ या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनार 20/9/2021 रोजी मा . आ.नारायण पाटील यांच्छा अध्यक्षेखाली संपन्न झाली.

भारत संताची भूमी आहे. संतामध्ये अहंकार नसतो. आज संताची गरज आहे. भारतीय संत साहित्याचे स्वरुप अत्यंत व्यापक आहे. संताचे विचार आम आदमी पर्यंत पोहचले पाहिजे. संत जोडायचे काम करतो. तोडायचे भाषा करत नाही. संत लोककल्याणकारी काम करायचे.

शील, सदाचार , अभ्यास , कर्म , धैर्य इ.संत साहित्याचे विशेषताएँ आहे. असे प्रतिपादन माजी कुलगुरु डाॅ. इरेश स्वामी यांनी केले. आंतरराष्ट्रीय वेबिनार मध्ये डाँ. तंकमणि अम्मा (केरल ) ,डाॅ.आलोक रंजन पाण्डेय (नई दिल्ली) , राकेश शंकर भारती (यूक्रेन ),डाॅ. वी. पद्मावती (कोईमतूर ),डाॅ.संतोष गिरहे (नागपुर) डा. रणजित जाधव (लातूर) , डा.अनुपमा तिवारी (कर्नाटक) ,डा. सुनिल कुलकर्णी (जलगांव) , डा. हप्रीत सिंह पंजाब डा. चंद्रशेखरन नायर (केरल) डा. नरेश सिहाग (हरियाणा )डा. एस. सुनंदा (केरल) इ. विदवानानी आंतरराट्रीय वेबिनार मध्ये मार्गदर्शन केले.

प्राचार्य डा. अनंत शिंगाडे यांनी सर्व पाहुण्याचे स्वागत केले . प्रास्ताविक डा. पंडीत बन्ने यांनी केले. आभार डा.नवनाथ गाडेकर व प्रा. रमेश पाटील केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

litsbros

Comment here