श्री महालक्ष्मी व्रतामुळे गुरुवारी महिलांची लगबग*

*श्री महालक्ष्मी व्रतामुळे गुरुवारी महिलांची लगबग*

केत्तूर (अभय माने) मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी महिलावर्ग श्रीमहालक्ष्मी व्रत करतात.मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार (ता.12) असल्याने महिला वर्गाची लगबग सुरू होती.

हेही वाचा – कुगाव-शिरसोडी पुलाचे काम प्रचंड वेगात चालू….

नारायण आबा पाटील यांच्या विजयाने करमाळा तालुक्यात उत्साहाचे वातावरण

या व्रतासाठी महालक्ष्मीची मुखवटे, श्री महालक्ष्मी व्रताची कथेची पुस्तके, फळे, फुले, झाडाची पाने, नारळ, विड्याची पाने, रांगोळी आदि साहित्य जमा करावे लागते.सर्व महिलांच्या भक्तीभावाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना. या महिन्यात गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करण्यात येते. घरातील देवघरासमोर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचन करून श्री महालक्ष्मीच्या प्रतिमेला प्रतिमेची पूजा केली जाते व आरती करतात.देवघरासमोर तसेच घराच्या समोरही आकर्षक रांगोळी काढली जाते.

karmalamadhanews24: