आम्ही साहित्यिकआरोग्य

***** डॉक्टर ***** —– मनाचा ठाव घेणारा एक मनोरंजक लेख—–

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

***** डॉक्टर *****
—– मनाचा ठाव घेणारा एक मनोरंजक लेख—–

🙏 डॉक्टर म्हणजे देव आणि या माझ्या सर्व 🙏
🌹 दैवतांना सादर 🌹
……. साधारण तो काळ होता 1985-86 चा खरे म्हणजे मध्य रेल्वेचा दौंड येथील स्टीम लोको शेड पूर्णतः बंद करून तेथील सर्व कामगार व सुपरवायझर आसपासच्या बहुतेक विभागामध्ये समाविष्ट केले व कामासाठी पाठवले गेले त्यामध्ये बहुतेक मोठ्या संख्येने कामगार डिझेल लोको शेड पुणे घोरपडी येथे आले ते सर्व जण आपापल्या क्षेत्रात प्रवीण होते मानसिक श्रम कमी व शारीरिक श्रम जास्त यावर त्यांचा अधिक भर होता व त्यात ते पारंगत सुद्धा होते.

त्यामध्ये एक डॉक्टर नावाचे व्यक्तिमत्व होते मी पाहिले व निरीक्षण केले तर बहुतेक साथीदार त्यांना डॉक्टर या नावाने संबोधित होते प्रथम राहणीमान व बोलण्याची लकब पण सुशिक्षित होती त्यामुळे मला पण प्रथमदर्शनी ते डॉक्टर असल्याचा भास झाला पण नंतर ते सर्व साथीदारांबरोबर अवजड कामे करीत असल्याचे दिसून आले दुपारी आम्ही सर्वजण एकत्र जेवायला बसत असे मी सहज जेवण झाल्यावर त्यांची एकांतात भेट घेऊन डॉक्टर या शब्दाबद्दल असलेले कुतूहल बोलून दाखवले त्यावर त्यांनी सांगितले की मी काय डॉक्टर वगैरे काही नाही पण गावाकडे असताना

 एका नाटकामध्ये डॉक्टरची भूमिका केली होती आणि ती एवढी गाजली होती तेव्हापासून मला डॉक्टर या टोपण नावाने ओळखले जाते माणूस स्वभावाने खूप चांगला व प्रेमळ होता इतरांना प्रत्येक कामात हातभार लावायचा मला खरोखरच डॉक्टर या विषयासाठी लिहिण्याची खरी प्रेरणा यांच्या पासूनच मिळाली
आता बघा समाजामध्ये कोणतेही डॉक्टर घ्या त्यांचे साधारणपणे दोन भाग पडतात काहीजण जातीने डॉक्टर म्हणजे मनापासून डॉक्टर की करणारे असतात पेशंट लवकरात लवकर बरा करणे अथवा त्याला आराम मिळावा असे उपचार करणे हे त्यांचे ध्येय असते तर दुसरा प्रकार व्यवसायाने डॉक्टर असणे यांचे ध्येय पेशंटच्या आजाराशी विशेष काही नसतं गणित असतं कि तिसरा मजला असतो

 त्याच्यावर चौथा मजला कसा चढवता येईल एवढेच त्यांचं ध्येय असतं एकदा काय झालं गावात एक चांगलं प्रस्थ होतं भरपूर शेतीवाडी नुकतच प्लॉटिंग केलेली भरपूर गुंठेवारी जागा त्यांना होता एकुलता एक मुलगा सर्व लाड पुरवायचे कशाची कमी नव्हती पण काहीतरी राशिभविष्य किंवा ग्रहमान प्रतिकूल असल्यामुळे लग्न लवकर होत नव्हतं कसेतरी करून शेवटी एकदाचं लग्न जमलं लग्न झालं तर तीन चार वर्षे झाली तरी लेकरूबाळ नाही म्हणून उपचार झाली नवस -सायास झाले प्रत्येक डॉक्टरांने त्यांना आपल्या इच्छेप्रमाणे चावून खाल्ले व आपला फायदा करून घेतला शेवटी एकदाचं बाईला दिवस गेले काय ते तिचे लाड व

 जपणूक तिला जिनासुद्धा चढून दिला जायचा नाही काजू बदाम खायचे बाकीची बहुतेक रेलचेलच होती झाले दर दोन महिन्यानी तपासणीसाठी डॉक्टरांकडे जावे लागायचे ती डॉक्टर पण गावात व आसपास एकटचं नावाजलेलं होतं त्याचा हातखंडा होता शेवटी प्रेग्नेंसी च्या तपासणीसाठी त्याच्याकडे घेऊन गेले त्या सूनेला तपासणीसाठी आतील बाजूस नेले व पडदा लावून त्याच्या नियमाप्रमाणे तपासणी केली व बाहेर आलं ते बारीक तोंड करून घेऊनच आता तुम्ही सांगा टेन्शन मध्ये खरं कोण असते पेशंट आणि त्याचे नातेवाईक हाय का नाय हितं तर डॉक्टरच टेन्शन मध्ये दिसत होतं डॉक्टर बेमालूमपणे तोंड बारीक करून बाहेर आलेलं त्यांनी बराबर हेरलं ह्यांनी डॉक्टर ला विचारलं का डॉक्टर काय झालं डॉक्टरने ओळखलं पायजाम्यावालं दिसतयं जेवढं चावता येईल तेवढं चावायचं लुटायला काय हरकत नाही डॉक्टर बाहेर आल्या-आल्या नुसतं स्तब्धच यांची उत्कंठा शिगेला पोचलेली तेवढ्यात डॉक्टर बारीक तोंड करून म्हणतंय * कठीण आहे… अवघड आहे * घरच्यांनी डॉक्टरला धीर दिला पैशाची काळजी करू नका डॉक्टरला हिरवा कंदील सिग्नल मिळाल्यासारखं झालं परत ऍडमिट केल्यावर दोन दिवसांमध्येच तिसऱ्या दिवशी डॉक्टर म्हणतयं पोरगं आडवं आलयं तरी सिझरिंग करावं लागेल घरचे म्हणाले ठीक आहे काही झालं तरी पोरीच सीझरिंग करून बाळंतपण सुखरूप करा आता दोन-चार दिवसात पोरीला डिस्चार्ज द्यावा का नाही पण उगाच आपलं बी पी जास्त आहे वगैरे कारणं सांगून आणखीन त्या बिचारीला दोन-चार दिवस दवाखान्यातील मुक्काम वाढवला शेवटी पंचेचाळीस हजार रुपये बिल करून कायम जवळजवळ दहा पंधरा दिवसानी त्या बाळासाठी फॉलो अप घ्यावा लागायचा व त्यासाठी किमान दोन चार हजार रुपये तरी डॉक्टर कापायचा आता ही झालं धंदेवालं डॉक्टर आणि हो अशा डॉक्टरांना काय म्हणावं तोंड दाबून बुक्क्याचा मार बरं गाडीचा मेकॅनिक जसा गॅरेजला गाडी नेल्यावर आपल्याला त्यातलं काही कळत नसतं तो म्हणेल तसं करावं लागतंय पार्ट बदलावे लागतात तसेच अगदी नुसतं ग्लुकोज सलाईन लावून ओ.पी.डी. मध्ये दोन तीन तास ठेवून हजारो रुपये बिल घेणारे डॉक्टर अस्तित्वात आहेत या ठिकाणी फक्त कन्सल्टिंग आणि बेड भाडं वाढवून जबरदस्त बिल केलं जातं माझ्या सुनबाईला तर ऑब्झर्वेशन च्या नावाखाली नुसतच दोन-तीन दिवस ऍडमिट करून घेतलं साधी गोळी पण दिली नाही शेवटी वाद घालून पेशंट आमच्या जबाबदारीवर घेऊन जात आहोत असं लिहून दिलं व डिस्चार्ज घेतला काय तर फक्त पोट दुखत होतं
आता दुसऱ्या प्रकारचे डॉक्टर असतात त्यांचे पहिले कर्तव्य असतं कमीत कमी खर्चात आणि वेळेत पेशंट बरा कसा करता येईल त्यात ते पारंगत असतात हा माझाच एक अनुभव सांगतो काही कारणास्तव मी बुधरानी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते त्यावेळी आय.सी.यू.मध्ये मला ठेवलेले होते तो दिवस साधारण शनिवारचा असावा आणि त्यावेळी कोरोना चा संसर्ग प्रादुर्भाव पण काही प्रमाणात होता
उपचारासाठी टेस्ट करणे आवश्यक होते माझ्या जवळ माझी सौ व मुलगी होती
त्यांच्याकडे ए.टी.एम.चे कार्ड होते पण त्यांना वापरायची माहिती नव्हती त्यावेळी त्यांनी डॉक्टरांना सांगितले फक्त अर्धा तास थांबा मुलगा आल्यावर पैसे काढून देईन परंतु माझ्यावर उपचार करणारे तेथेच उपलब्ध असणारे व येथेच एका देवाने अवतार घेतला व त्यांच्या रूपात माझ्यावर उपचार करणारे डॉक्टर माननीय जाकिर जमादार हे स्वतः हजर होते त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे काढले व आमच्या माणसा कडे देऊन पहिला रिपोर्ट आणून द्या म्हणून सांगितले ऑनलाईन रिपोर्ट मागून घेऊन उपचार सुरू केले व माझा पुढील धोका टाळला काही डॉक्टर असेही असतात आता खरे सांगायचे म्हणजे त्याच काळात काहीतरी कारण असे कि युरिन इन्फेक्शन झाल्यामुळे माझ्यावर स्कोपी करावयाची होती तर पुण्यातील नामवंत यूरोलॉजिस्ट माननीय डॉक्टर अनुराग अवस्थी यांनी ही प्रक्रिया पूर्ण करून आजाराचे निदान केले त्यावेळी माझ्या आजाराशी संलग्न असलेले नामांकित तज्ञ नेफ्रॉलॉजिस्ट डॉक्टर माननीय भूपेशकुमार कवारे सर यांनी आपली वैद्यकीय शक्ती पणाला लावून मला खूप कमी वेळात एकदम बरे केले त्याबद्दल आमचे पूर्ण कुटुंब त्यांचे फार आभारी आहेत आणि हो माननीय डॉ.अवस्थी सरांनी कॅन्सरचे निदान केले व लवकरच ही माहिती आम्हा कुटुंबाला दिली माझी मुलगी अपोलो क्लीनिक वानवडी येथे सेवेमध्ये असते तिने सांगितले की मा.डॉक्टर अवस्थी हे नाव जरी ऐकले तरी ते कोणते स्पेशलिस्ट आहेत हे सांगण्याची काही गरज नाही एवढे ते महान तज्ञ आहेत तर ते येथील एक महान यूरोलॉजिस्ट आहेत नंतर माननीय अवस्थी सरांनी आमच्या कुटुंबाशी गुप्तपणे सल्लामसलत करून या बद्दलची माहिती दिली हो आम्ही ताबडतोब आमचे रेल्वेचे लोकप्रिय माननीय डॉक्टर अविनाश निकाळजे सर यांची गाठ घेऊन त्यांना माहिती दिली त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मला त्याच दिवशी रेल्वेचे कागदपत्रे घेऊन भायखळा येथील उपचारासाठी मला पाठवले व माझा धोका टळला या सर्व प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सिंहाचा वाटा खरेतर माननीय निकाळजे सरांचा आहे त्यांनी वेळीच निर्णय घेतल्यामुळे मला नवीन जिंदगी मिळालेली आहे आणि त्यावेळी डॉक्टरांनी अजून एक सल्ला दिला मी 2013 पासून ऍन्जिओग्राफी एन्जोप्लास्टी झाल्यामुळे सुमारे दहा-बारा गोळ्या दररोज खात असे तर डॉक्टरांनी त्या गोळ्यांचा डोस फक्त चार गोळ्यावर आणला व इतर एलर्जी पासून माझी सुटका केली त्यामुळे डॉक्टर हे नुसते मेडिकल ऑफिसर नसून आम्हा बेंद्रे कुटुंबाचे सदस्य म्हणजे फॅमिली डॉक्टर आहेत खरोखर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन पुढील कारवाई ताबडतोब केली धन्यवाद आणि हो डॉक्टर अवस्थी सरांनी अगदी वेळेवर म्हणजे खूप लवकरच रोगाचे निदान करून आम्हाला उपचार करण्यासाठी मदत व सल्ला दिला व मार्ग मोकळा केला खरच देवाचे आभार मानावे लागेल की अगदी वेळेवर माननीय अवस्थी सरां सारख्या देवाच्या अवताराशी आमचा संपर्क आल्याबद्दल….
तसे पाहिले तर मला माझ्या काही शारीरिक व्याधीमुळे कारणास्तव ज्यांचा मोलाचा उपचार मिळाला लाभला त्यामध्ये मान.डॉक्टर आठवले सर निकाळजे सर मिश्रा सर तसेच आरती फप्पे मॅडम वंदना सैनी मॅडम डॉक्टर हेडावू डॉक्टर राजकुमार डॉक्टर सोरटे यांची मोलाची मदत मिळाली अगदी त्याच तोलामोलाचे मला माझ्या नशिबाने भायखळा रेल्वे हॉस्पिटल मधील माननीय डॉक्टर देवेंद्र कुमार पॉल यांनी तर माझ्या व्याधीबद्दल अगदी अचूक निदान उपचार करून मला नवीन जिंदगी बहाल केली असे म्हटले तर वावगे होणार नाही असे डॉक्टर उपचारासाठी लाभणे हे आपले भाग्यच म्हणावे लागेल काय आणि केवढी ती माणुसकी मोठी प्रक्रिया करायचे ऐवजी फक्त केमो थेरपी वर मला पूर्णपणे बरे केले नंतर दर 20 दिवसांनी केमो दिला जायचा त्यावेळी मी पुण्याहून उपचारासाठी दर 20 दिवसांनी जायचो मला चालताना होणारा त्रास पाहून डॉक्टर साहेबांनी त्या वीस दिवसांच्या कालावधीमध्ये येणारे सहा भारी प्रतीचे इंजेक्शनचे सेट माझ्याबरोबर देऊन ती इंजेक्शन पुण्यालाच घ्या म्हणून सांगितले व माझा शारीरिक त्रास कमी केला भगवंताने त्यांच्या हाताला भरपूर यश देऊन मला पुन्हा नव्याने जगण्याची उमेद दिली माझ्या लहानपणापासून खरे तर माझे बालपण हे भीमा नदीच्या तीरावर वसलेले व आई पोमाईच्या कृपाशीर्वादाने पावन अशा पोमलवाडी नगरीत गेले
तिथे आमचे म्हणजे संपूर्ण गावाचे लाडके व प्रेमळ असे माननीय डॉक्टर बाबुशेठ कटारिया रात्री अप रात्री गेल्यावर झोपेतून उठून उपचार करणार व पैशाचं विचारल्यावर पैशाचं सोडा हो आधी माणसं कमवायची मग पैसा कमवायचा असा हा पोमलवाडी करांचा बेअरर चेक होता यांच्या वागणुकीचा माझ्यावर प्रभाव पडला व खूप विचाराअंती अशा प्रकारचे लेखन करण्याची प्रेरणा मिळाली त्यानंतर दर शुक्रवारी येणारे लोकप्रिय माननीय डॉक्टर हिंगमिरे यांचा उपचार तर काय म्हणायचा त्यांनी केलेल्या चौकशीमध्येच आजार गायब व्हायचा थंडी ताप बघूनच पेशंटला विचारायचे तुला किती इंजेक्शन देऊ बाबा अशी करमणूक करून उपचार करायचे उपचारापेक्षा जनरल नॉलेज चा जास्त भरणा त्यामुळे ते लोकप्रिय झाले होते आपण जेव्हा पेशंट असतो तेव्हा डॉक्टरांचे व आपले संबंध जरी सौख्याचे असले तरी आत केबिन मध्ये जायचे वेळेला ऑटोमॅटिक बी.पी.वाढतो आणि पेशंट आणि डॉक्टर असे हे नैसर्गिक नाते आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या फॅमिली डॉक्टरांशी एवढी महान अंधश्रद्धा निर्माण होते की उदाहरणार्थ आपल्याला निद्रानाश आहे तर आपल्या फॅमिली डॉक्टरांनी ग्लुकोज गोळी दिली तरी त्यामुळे शरीराला कोणत्याही प्रकारचा फायदा किंवा नुकसान होत नाही अशी गोळी खाल्ल्यावर डॉक्टरांनी झोपेची गोळी दिलेली आहे या दहशतीमुळे तो माणूस दोन मिनिटांमध्ये झोपी जातो ही एक प्रकारची मानसिकता असते आणि हो काही अपवादात्मक डॉक्टरांचे ध्येय नुसता पैसा कमावणे हे नाही तर त्यांना मिळणारा मेडिकल स्टोअर व सर्जिकल शॉप तर्फे ठराविक ठिकाणी मिळणारे कमिशन कडे जास्त आवड असते उगीचच पेशंटला ठराविक ठिकाणीच टेस्ट करण्याचा आग्रह करतात पेशंटच्या आजाराशी अशा काही डॉक्टरांचा विशेष काही संबंध नसतो मी अनुभव घेतलेला आहे दौंडला मशीन दवाखान्यात माझे नातेवाईक ऍडमिट होते काहीतरी फ्रॅक्चर वगैरे ची शस्त्रक्रिया औषध उपचार औषध गोळ्या मिळून सुमारे 12 दिवसाचे 72 हजार रुपये बिल झाले होते दवाखाना ख्रिस्त मिशनचा होता सकाळची प्रेयर झाल्यावर लगेचच आम्ही डायरेक्ट माननीय डॉक्टर पवार सर यांचे पाय धरले व घरची बिकट परिस्थिती कथन केली तर अवघ्या पंचवीस हजार रुपये भरण्याची संधी दिली चॅरिटीच्या नावाखाली बिल माफ केले एकदा तर काय झाले पुणे येथील ससून रुग्णालयात एक जण चांगला पंधरा दिवस उपचार घेऊन नीट झाला डिस्चार्ज वेळी काही तरी आठ हजार चारशे दहा रुपये बिल आले तर आम्ही दोघांनी मिळून त्या पेशंटला व्हील चेअरवर बसवून मोठ्या डॉक्टरांकडे गेलो व सदर रुग्ण हा घरी गरीब असल्यामुळे बाहेर खाजगी बिल्डिंगची पेंटिंग ची कामे करीत आहे त्याला वारसदार कोणीही नाही असे सांगितल्यावर डॉक्टरांनी सर्व बिल माफ करून त्याला डिस्चार्ज दिला अशा डॉक्टरांचे ऋण आपल्यावर कायम असते
आणि आता अजून एक तो काळ सुमारे 2020 ते 2021 या कालावधीत कोरोनाने संपूर्ण भारतात थैमान घातले होते त्यामध्ये आदरणीय डॉक्टर… नर्स…सफाईवाले… आरोग्य विभागाशी निगडित… सर्व पोलीस अधिकारी… पोलीस निरीक्षक… पोलीस उपनिरीक्षक… वाहतूक पोलीस… माझे पोलीस कर्मचारी… सर्व मीडिया… व माझे पत्रकार बांधव या विभागाशी निगडित होते… तसेच शेतकरी म्हणजे त्या अवस्थेत अगदी कसलीही वाहतुकीची सोय नसताना आरोग्याला पोषक असा भाजीपाला ताजी फळे धान्य प्रत्येक गावामध्ये व प्रसंगी दारोदारी जाऊन सेवा पुरवणारे आमचे आधारस्तंभ बळीराजा शेतकरी हेच तर खरे कोरोनाचे वारियर्स म्हणजे योद्धे आहेत आरोग्य विभाग व पोलिस विभाग यंत्रणा ने अतोनात व अहोरात्र परिश्रम घेऊन या प्रादुर्भावापासून जनतेचे रक्षण मोठ्या प्रमाणात केलेले आहे अगदी सोळा सोळा किंवा अठरा-अठरा तास अगदी नियमित 24तास विना विश्रांती किंवा अन्नपाण्याशिवाय सेवा करून एक आदर्श पायंडा घालून दिला अगदी घरा दाराची सुद्धा पर्वा केली नाही हा आणि समाजामध्ये काही विशिष्ट सेवा देणारे डॉक्टर सुद्धा उपलब्ध आहेत त्यात काही दाताचे डॉक्टर आहेत काही त्वचेचे आहेत लहान बाळांचे आहेत अगदी तसचं मुक्या प्राण्यांचे देखील डॉक्टर आहेत अगदी माझ्या गावातले माननीय डॉक्टर राजगुरू हे कुष्ठरोग निवारण तज्ञ होते तो काळ साधारण 1970 -1972 चा होता त्यावेळी त्या जनरेशन मध्ये कुष्ठरोगी रुग्णांच्या सहवासात कोणी येत नव्हतं किंवा स्पर्श पण करीत नव्हते परंतु आमचे माननीय डॉक्टर साहेब त्या रुग्णाची जखम हाताळून त्याला एक प्रकारचा धीर व मानसिक आधार द्यायचे रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य सुद्धा इतके प्रेमाने बोलत नसेल तसेच अजून एक अनुभव सांगावासा वाटतो की ताडीवाला रोड पुणे येथे माननीय डॉक्टर पालवे हे माझी नात हमेशा काहीतरी कारणास्तव लहान बाळ असल्यामुळे डॉक्टरांकडे न्यावे लागत असे पण काही वेळेला कार्यालयीन वेळे शिवाय इतर वेळी म्हणजे रात्री बारा साडे बारा वाजताच्या दरम्यान काहीतरी त्रास व्हायला लागला म्हणून माझ्या मुलीने डॉक्टरांना फोन केला त्यांनी सांगितले की मेडिकल स्टोर मध्ये जाऊन मेडिकल स्टोर वाल्याला हा फोन द्या त्यांनी काहीतरी विशिष्ट सूचना दिल्या त्यावर त्यांनी लिक्विड व औषध देऊन बाळाचा त्रास कमी केला मुलगी सकाळी ठणठणीत बरी झाली व खेळू लागली असेही काही प्रावीण्य डॉक्टरांच्या अंगी व हातात असतात आणि काही वेळेला डॉक्टरांनी दिलेली औषधाची मात्रा लागू पडत नाही म्हणून डॉक्टर खराब असतात किंवा नीट उपचार करीत नाही त्याला काय येत नाही हा निव्वळ अडाणीपणा गैरसमज आणि मूर्खपणा आहे याचा उघड उघड अर्थ असा होतो की ती दिलेली मात्रा व तुमची शारीरिक व मानसिक अवस्था बिघडलेली असते त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी झालेली असते जेवण व आहारामध्ये भरपूर तफावत पडलेली असते भरपूर प्रमाणात खाणं जात नाही म्हणून अशक्तपणा आलेला असतो म्हणजेच त्या औषधाला आपली शरीरयष्टी नीट प्रतिसाद देत नाही इम्युनिटी पावर कमी असते औषध विषारी नसते फारतर रिॲक्शन होते त्यामुळे ते पूर्ववत परिस्थितीत आणण्यासाठी प्रत्येक डॉक्टर हे सक्षम असतात कोणतेही डॉक्टर हे तिरसट वृत्तीचे नसतात उलट त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे किंवा हावभावा कडे पाहून खरंच निम्मे आजार बरे होतात म्हणून औषधांबरोबरच मानसिकता प्रभावी असणे हेही बरे होण्यामागचे कारण आहे आणि हो प्रत्येक डॉक्टर हे त्यांनी निवडलेल्या क्षेत्रामध्ये प्रवीण व अग्रेसर तसेच पारंगतचं असतात
शरीरात कुठेही दुखत असले तरी डॉक्टरांच्या उपचाराने बरे करता येते परंतु मन जर दुखत असलं तर कोणत्याही डॉक्टरांच्या उपचाराने बरे होत नाही
………………………………………….
किरण बेंद्रे
पुणे
7218439002

litsbros

Comment here