दिवाळी सुट्टी संपल्याने एसटी तसेच रेल्वे स्थानकावर गर्दीचा महापूर

*दिवाळी सुट्टी संपल्याने एसटी तसेच रेल्वे स्थानकावर गर्दीचा महापूर*

केत्तूर ( अभय माने) दिवाळीचा सण संपत आल्याने गावाकडे आलेले गावकरी तसेच चाकरमानी पुन्हा शहराकडे परतू लागले आहेत त्यामुळे रेल्वे स्थानक तसेच बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी होत आहे.एसटी बस किंवा रेल्वे स्थानकावर आल्यानंतर प्रवाशांची झुंबड उडत आहे.

सध्या सध्या प्रत्येक एसटी बस प्रवाशांनी खचाखच भरून जात असल्याने एसटी महामंडळाला दिवाळी पावल्याचे दिसून येत आहे. तर ग्रामीण भागातील वेळापत्रकाप्रमाणे बस येत नसल्याने प्रवाशांना ताटकळत थांबावे लागत आहे रेल्वे स्थानक दुहेरी करणारना नंतर चकाचक करण्यात आली असली तरी या रेल्वे स्थानकावर रेल्वेगाड्या मात्र थांबत नसल्याने रेल्वे प्रवाशांना काहीही फायदा होताना दिसत नाही.

हेही वाचा – पाणलोट अन पोमलवाडी ……. ( माझी 50 वर्षांपूर्वीची पोमलवाडी )

मातृ शक्तीचा सन्मान करणे कर्तृत्वाची भरारी घेण्यास प्रेरणादायी – नारी शक्ती गौरव पुरस्कार प्रदान सोहळयात प्रा. करे-पाटील यांचे प्रतिपादन

” राज्यातील सर्वात जास्त रेल्वे स्थानकावरून रेल्वे धावते त्या करमाळा तालुक्यातील जिंती,पारेवाडी,वाशिंबे, पोफळज,जेऊर,केम,भाळवणी चा सात रेल्वे स्थानकावरून रेल्वे धावते परंतु केम व रेल्वे येथेच रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात आलेला आहे.प्रवाशांची मागणीव गरज लक्षात घेता पारेवाडी,वाशिंबे रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा देणे गरजेचे आहे.
– अक्षय माने, प्रवाशी,पारेवाडी (ता.करमाळा)

छायाचित्र -रेल्वे स्थानकावर झालेली प्रवाशांची गर्दी

karmalamadhanews24: