सांस्कृतिकसोलापूर

दिवाळी सणासाठी उत्साह नाहीच; बाजारपेठेत सन्नाटा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दिवाळी सणासाठी उत्साह नाहीच; बाजारपेठेत सन्नाटा

केतूर (अभय माने) दिवाळी सण दोन दिवसावर आला असतानाही करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागात खरेदीचा उत्साह दिसून येत नाही ग्रामीण भागात बाजारपेठांमध्ये दिवाळी सणाची सामान खरेदी मंदावली आहे गेल्या दोन वर्षापासून कोरणा चे संकट डोक्यावर घोंगावत असल्याने सगळीकडेच आर्थिक गणित बिघडल्याने जनतेमध्ये सणाविषयी अनुत्साह आहे.

नेहमी ग्रामीण भागात दिवाळी सणाच्या खरेदीसाठी दिवस अगोदरच बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत असे परगावी गेलेली मंडळी दिवाळी सणासाठी आवर्जून गावीयेत असून त्यांनी आणलेल्या पैशातून दिवाळी सणाच्या सामानाची खरेदी होत असे.

परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरणा मुळे सगळेच आर्थिक गणित बिघडले आहे त्याचा परिणाम सण-उत्सव आवर होत असून सण-उत्सव हे केवळ औपचारिकता बनत चालले आहेत.

त्यातच शेतकऱ्याची उसाची बिल यापूर्वी दिवाळीसाठी निघत असेल परंतु कारखान्यांनी ते दसऱ्या पूर्वीच दिल्याने शेतकऱ्यांच्या हातात सध्या पैसाच नाही.

हेही वाचा – रावगाव व पांडे येथे करमाळा तालुका न्यायालय विधी सेवा समिती मार्फत “आझादी का अमृत महोत्सव” कार्यक्रम संपन्न

सरडे यांच्या राजीनाम्या नंतर ‘हे’ झाले करमाळा पंचायत समितीचे उपसभापती; वाचा सविस्तर

त्यातच धोरणाची संकट सुरू असताना शेतात पिकवलेल्या कोणत्याही शेतीमालाला योग्य दर मिळाला नाही आणि महागाईने मात्र सर्वत्र क्षेत्रात उच्चांक प्रस्थापित केला आहे त्यामुळे दिवाळी साजरी करायची तरी कशी हा प्रश्न शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना पडला आहे.

litsbros

Comment here