वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या दिवाळीवर संक्रात
केतूर (अभय माने) ; सध्या पेट्रोल, डिझेलचे दर वरचेवर वाढत आहेत.घरगुती गॅसचा भडका होत असतानाच दिवाळी सणाला फराळासाठी लागणाऱ्या विविध किराणा मालाचे दरही गगनाला भिडल्याने या वर्षाची दिवाळी गॉड होण्याऐवजी गोरगरीब, सर्वसामान्यांना तसेच मोल मजुररी करणाऱ्यांना तिखट झाली आहे.
गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्यांची दिवाळी कोरडी गेली आता कोणाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या वर्षी तरी दिवाळी जोशात साजरी करता येईल अशी आशा सर्वांनाच होती.
शेतीवरून वाद, पोमलवाडी येथील चार जणांविरुद्ध करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल
परंतु महागाई मात्र वाढता वाढता वाढतच असल्याने सर्वसामान्य नागरिक हतबल झाला आहे.वरचेवर उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती होत आहे.
वाढत्या महागाईमुळे ग्राहक किराणा दुकानात दिवाळीची सामान खरेदी करताना हात आखडता घेत असल्याचे किराणा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.कापड दुकानदार ही ग्राहकांची वाट पाहत असल्याचे दिसून येत आहे.
Comment here