दिवाळी साठीचा आनंदाचा शिधा; स्वस्त धान्य दुकानातून वाटप सुरू

दिवाळी साठीचा आनंदाचा शिधा; स्वस्त धान्य दुकानातून वाटप सुरू

केतूर (अभय माने) केत्तूर (ता.करमाळा) येथील स्वस्त धान्य दुकानात दिवाळीसाठीचा आनंदाचा शिधा आला असून लाभार्थ्यांना त्याचे वाटप सुरू झाले आहे.केत्तूर येथे 179 लाभार्थ्यांना आनंद शिधा वाटप करण्यात आल्याचे स्वस्त धान्य दुकानदार अण्णा गोपाळा मोरे यांनी ‘करमाळा माढा न्यूज’शी बोलताना सांगितले.

100 रुपयांत साखर, तेल, चणाडाळ, रवा या साहित्याचा शिध्यामध्ये समावेश असून नव्याने यामध्ये मैदा व पोह्याचा समावेश करण्यात आला आहे. दिवाळी सणानिमित्त हा शिधा देण्यात आला आहे.

हेही वाचा – केतूरच्या सरपंचपदी सचिन वेळेकर तर ‘हे’ आहेत इतर विजयी उमेदवार; क्लिक करून वाचा केत्तूर

के.के.लाईफस्टाईल करमाळा येथे दिवाळी ऑफर “हमखास बक्षीस योजना” सुरू ; ‘या’ लकी ग्राहकाला मिळाला सॅमसंग मोबाईल गिफ्ट

यापूर्वी गणेशोत्सवाचाही आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता. दिवाळीच्या तोंडावर का होईना आनंदाचा शिधा मिळाल्याने लाभार्थ्यामधून समाधान व्यक्त केले जात आहे.

छायाचित्र- केत्तूर येथे आनंदाचा शिधा वाटप करताना बाबासाहेब मोरे
( छायाचित्र- अक्षय माने,केत्तूर)

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line