दिवसाआड पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे ग्रामीण भागातील रस्ते चिखलमय

*दिवसाआड पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे ग्रामीण भागातील रस्ते चिखलमय*

केत्तूर (अभय माने ) करमाळा तालुक्यात जून महिना वगळता जुलै महिना संपत आला तरी मोठा पाऊस झाला नसल्याने तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून अधून मधून पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे पिके तरारून आली असलीतरी शेतामध्ये तण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने तणनाशकांचा नाहक खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

रिमझिम पावसामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची पूर्ती वाट लागली आहे त्यातच बहुतांश गावामध्ये जलजीवनची कामे सुरू आहेत अथवा पावसाळ्यापूर्वी झाली आहेत अशा गावात रस्त्यावर अक्षरशः वरवंटा फिरवला गेला आहे.जलजीवनचे पाईप गाडण्यासाठी काळी मातीवर आली आहे. त्यामुळे रिमझिम पाऊस झाला की, चिखल होत असल्याने रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साठवून अपघात होत आहेत तर काही ठिकाणी घसरगुंडी होत आहे.या रस्त्यावरून चिखलातून साधे चालताही येत नाही. ग्रामपंचायतीने काही ठिकाणी रस्त्यावरती मुरूम टाकला आहे परंतु सर्वच रस्ते चिखलमय झाले आहेत त्यामुळे ग्रामस्थांसह शाळकरी विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचा – माझ्या यशात श्री नंदिकेश्वर विद्यालयाचा सिंहाचा वाटा- सीए आशिष नकाते सी.ए (सनदी लेखापाल) च्या अंतिम परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल विद्यालयाच्या आशिष नकाते यांचा सत्कार  

श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम येथील अनुष्का राजकुमार होरणे या विद्यार्थिनीची उत्तुंग बालवैज्ञानिक स्पर्धेतून निवड;इसरो, आयआयटी, सायन्स सिटी अहमदाबाद पाहण्याची संधी

पुणे जिल्हा व परिसरात होत असलेल्या पावसामुळे उजनी जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.उजनी जलाशयाचा पाणीसाठा आणि उन्हाळ्यात वजा 60% पर्यंत गेला होता तो सध्या वजा 22 टक्केवर आला आहे.उजनी जलाशयात वाढणाऱ्या पाण्याबरोबर जलपर्णीही मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line