राजकारणराष्ट्रीय घडामोडी

महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा जलवा, लोकसभा पोटनिवडणुकीत सेनेच्या उमेदवार विजयी; भाजप उमेदवाराला ५० हजार मतांनी धोबीपछाड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा जलवा, लोकसभा पोटनिवडणुकीत सेनेच्या उमेदवार विजयी; भाजप उमेदवाराला ५० हजार मतांनी धोबीपछाड

दादरा नगर हवेलीच्या जनतेनं कलाबेन डेलकर यांना विजयी केलं आहे. कलाबेन डेलकर यांना 1 लाख 16 हजार 834 तर भाजपच्या महेश गावित यांना 66 हजार 157 मतं मिळाली आहेत. BJP उमेदवाराचा 50 हजार 677 मतांनी पराभव, 

दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मतमोजणीच्या बावीस फेऱ्या झाल्या आहेत. पोटनिवडणुकीत माजी खासदार मोहन डेलकर यांची पत्नी शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी विजय मिळवला आहे.

दादरा – नगर हवेली आणि दमण – दीव या केंद्रशासित प्रदेशाचा भाग असलेल्या जागेसाठी ३० ऑक्टोबरला मतदान झाले होते.

हेही वाचा- शेतीवरून वाद, पोमलवाडी येथील चार जणांविरुद्ध करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री देशमुख यांना अटक; राष्ट्रवादीला झटका, पुढचा नंबर ‘या’ मंत्र्यांचा..

अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या निधनामुळे लोकसभेच्या या जागेसाठी पोटनिवडणूक घ्यावी लागली. मोहन डेलकर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकी भाजपचे तत्कालीन विद्यमान खासदार नटूभाई पटेल यांचा ९,००१ मतांनी पराभव करत विजय मिळवला होता.

मोहन डेलकर यांनी २२ फेब्रुवारी २०२१ ला मुंबईतील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. डेलकर हे आधी काँग्रेस आणि नंतर भाजपमध्येही होते.

litsbros

Comment here