डिकसळ पुलावरील वाहतूक बंद केल्याने वीस गावातील रुग्ण, विद्यार्थी, नागरिकांचे हाल; हलक्या स्वरूपात जीवनावश्यक वाहतूक सुरू ठेवण्याची मागणी
केत्तूर (अभय माने) सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्याला जोडला जाणारा उजनी जलाशयावरील (ज्या ठिकाणी उजनी जलाशयात पुणे जिल्ह्यातील पाणी येते तो भाग) 167 वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन डिकसळ पुलावरील वाहतूक प्रशासनाने बंद केल्याने उजनी पुनर्वशीत गावांचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला आहे.
या ठिकाणी “जडवाहतुकीस काटेकोरपणे बंदी करून हलक्या स्वरूपाची वाहतुक सुरू करण्यात यावी” अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
परिसरातील रुग्ण, गरोदर महिलामहिला, बच्चे कंपनी तसेच शालेय विद्यार्थी प्रामुख्याने पुणे, बारामती, दौंड, भिगवन, इंदापूरकडे जाण्यासाठी या पुलाचा वापर करीत असत. उजनी जलाशयाचा पाणीसाठा अध्यापतरी 100 % च्या आसपास आहे त्यामुळे हा निखळलेला भाग केव्हा निखळला हे पाण्याखाली असल्याने हे सांगता येत नाही.पुलाचा निखळलेला तो भाग पाणी कमी झाल्यानंतर निदर्शनास आल्यानंतर या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे .
यापूर्वीच बंदी असतानाही या पुलावरून ऊस वाहतूक, वाळू वाहतूक,याबरोबरच इतर जड वाहतूक बिंनदिकतपणे होत होती त्यामुळे पुलास धोका निर्माण झाला आहे.
संपर्क तुटलेली गावे –
कोंढारचिंचोली, कात्रज, टाकळी, खातगाव , गोपेगांव, वाशिंबे, सोगाव, उंदरगाव, मांजरगाव, कुंभारगाव,केत्तूर,रामवाडी, पारेवाडी,जिंती,हिंगणी,गुलमोहरवाडी,भगतवाडी,दिवेगव्हाण,देलवडी आदि.
Comment here