बुधवारी शिक्षणमंत्री दिपक केसरकर कार्यक्रमासाठी करमाळ्यात..

बुधवारी शिक्षणमंत्री दिपक केसरकर कार्यक्रमासाठी करमाळ्यात..

केतूर (अभय माने); करमाळा शहरातील उर्दू शाळेला नववी व दहावीच्या तुकडीला मान्यता दिल्याबद्दल करमाळा तालुका सकल मुस्लिम समाजाच्या वतीने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर व या कामासाठी प्रयत्न करणारे करमाळ्याचे सुपुत्र व मुख्यमंत्री कार्यालयाचे ओएसडी मंगेश चिवटे यांचा सत्काराचा कार्यक्रम 28 जून बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजता नालबंद मंगल कार्यालय करमाळा येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला करमाळा तालुक्यातील मुस्लिम समाजासह शिक्षण क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान करमाळा तालुका मुस्लिम समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

करमाळा शहरातील उर्दू शाळेत नववी व दहावीच्या वर्गाला मान्यता नसल्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवीतूनच शाळा सोडून दिल्यानंतर पुढील शिक्षणाची सोय होत नव्हती.

विद्यार्थिनीला तर आठवीची शाळा झाल्यानंतर उर्दू शिक्षण उपलब्ध नसल्यामुळे त्यांना पुढील शिक्षण मिळत नव्हते व लहान वयातच वैवाहिक जबाबदारी पार पाडत पार पाडावी लागत असल्याचे चित्र होते.

 

गेली दहा ते पंधरा वर्षांपासून उर्दू शाळेची व्यवस्थापन समिती व मुस्लिम समाजाचे प्रमुख पदाधिकारी या शाळेला नववी ते दहावीची तुकडी मिळावी म्हणून प्रयत्न करत होते.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक या मागणीचा विचार करून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या दोन वर्गांना मान्यता दिली यामुळे करमाळा तालुक्यातील सकल मुस्लिम समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

नामदार केसरकर यांचा सकल मुस्लिम समाजाच्या वतीने करमाळ्यात कार्यक्रम घेण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित राहणार आहेत.

तरी या कार्यक्रमाला कंदर केम जेऊर आवाटी सह करमाळा शहर व परिसरातील मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व शिक्षक मंडळींनी उपस्थित राहावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील यांनी केले आहे.

karmalamadhanews24: