ताज्या घडामोडीदेश/विदेश

आमच्या सुनेचे इरफान पठाण सोबत अनैतिक संबंध; या माजी पोलीस अधिकाऱ्याच्या आरोपाने क्रीडाक्षेत्रात खळबळ

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आमच्या सुनेचे इरफान पठाण सोबत अनैतिक संबंध; या माजी पोलीस अधिकाऱ्याच्या आरोपाने क्रीडाक्षेत्रात खळबळ

दिल्ली; माजी क्रिकेटर इरफान पठाण याचे सूनेशी अनैतिक संबंध असल्याचा गंभीर आरोप अहमदाबाद पोलिस दलातून निवृत्त झालेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीने केला आहे. याबाबतचा एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच इरफान पठाण त्याच्या नावाचा वापर करून त्यांच्या मुलाला धमकावत आहे, असेही यामध्ये म्हटले आहे.


सय्यद इब्राहिम असे त्या वृद्धाचे नाव आहे. त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. इब्राहिम यांनी पोलिस ठाण्यात येऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी इब्राहिम आणि त्यांच्या पत्नीविरोधात पोलिस ठाण्यात येऊन आत्महत्येची धमकी दिल्याने एफआयआर दाखल केली आहे.

तसेच दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, इब्राहिम यांच्या सुनेने 11 मार्च, 2021 ला त्यांच्या पूर्ण कुटुंबाविरोधात हुंडा मागितल्याची तक्रार दिली. त्याप्रकरणावर पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. त्यावर इब्राहिम यांनी आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवले जात आहे. माझ्या सुनेचे इरफान पठाणसोबत अनैतिक संबंध आहेत, असे म्हटले आहे.

हेही वाचा-धक्कादायक बातमी; करमाळा तालुक्यातील ‘या’ गावात कोरोनाने फक्त 15 दिवसात झाला 20 जणांचा मृत्यू

रमजान ईद झाल्यावर सोलापूर जिल्ह्यात लाॅकडाऊन करावा; करमाळयातील ‘या’ मुस्लिम नेत्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे आग्रही मागणी

तसेच इब्राहिम यांचा मुलगा सय्यद याने दिलेल्या माहितीनुसार, इरफान आणि माझ्या पत्नीचे लग्नापूर्वीच अनैतिक संबंध होते. माझी पत्नी इरफान पठाणची चुलत बहिण लागते. ते दोघे एकमेकांना अनेक दिवसांपासून ओळखतात.

इरफान पठाण माझ्या पत्नीला गुपचूप फिरायलाही नेत होता. ते दोघेही व्हिडिओ कॉलवर नेहमी बोलत असतात, असे सांगितले आहे.

litsbros

Comment here