ध्वनी प्रदूषण टाळत नेताजी विद्यालयाची गणेश विसर्जन
केत्तूर (अभय माने) केत्तूर (ता. करमाळा) येथील नेताजी सुभाष विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या गणेश मूर्तींचे सहाव्या दिवशी शुक्रवार (ता.12) मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात भक्तीमय वातावरणात अथांग भरलेल्या उजनी जलाशयाच्या पात्रात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
पावसाने विश्रांती घेतलेली विना अडथळा विसर्जन पार पडले यावेळी गणपती बाप्पा मोरया s s,मंगलमूर्ती मोरया ss गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला अशा घोषणा विद्यार्थी देत होते.
यावेळी प्रदूषण टाळत शालेय ढोल पथकाच्या निनादात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी गुलाल व टाके यांनाही फाटा देण्यात आला होता.
शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात आला. या उपक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागातील रामचंद्र मदने, किशोर जाधवर व इतर शिक्षकांनी केले. यावेळी प्राचार्य काशिनाथ जाधव पर्यवेक्षक भीमराव बुरुटे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.