आरोग्यदेश/विदेश

आता ‘या’ देशात ही मास्कची गरज नाही, सोशल डिस्टन्स ही राखू नका अशा सूचना जाहीर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आता ‘या’ देशात ही मास्कची गरज नाही, सोशल डिस्टन्स ही राखू नका अशा सूचना जाहीर

जगभरात अनेक देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देशात लसीलरण सुरू आहे. अनेक देशात मास्क, सुरक्षित अंतर हे नियम पाळणे बंधनकारक आहे. मात्र एक देश असा आहे जेथे हे नियम पाळण्याची गरज नाही.

अमेरिकेच्या लोकांसाठी दिलासादायक बातमी आहे. अमेरिकेत पूर्णपणे लसीकरण झालल्या लोकांनी मास्क घालणे किंवा सोशल डिस्टंसिंग पाळणे आवश्यक राहिलेले नाही. याबाबत अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने (सीडीसी) सूचना दिल्या आहेत.

गेल्या महिन्याचा शेवटच्या आठवड्यात अमेरिकेची प्रमुख आरोग्य संस्था सीडीसीने स्पष्टपणे अमेरिकी नागरिकांना मास्क न घालण्याची सूचना केली होती. ज्या नागरिकांनी कोरोना लसीकरण पूर्ण केले आहे त्यांनी अनोळखी लोकांची गर्दी सोडून अन्यत्र कुठेही फिरताना मास्क घालण्याची गरज नाही, असे म्हटले होते. मात्र, आज कुठेही मास्क न लावता फिरू शकता असे म्हटले आहे.

मास्क फ्री देश बनण्याबरोबरच कोरोना दूर ठेवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागत होते, ते देखील आता लस घेतलेल्यांनी पाळण्याची गरज नसल्याचे सीडीसीने म्हटले आहे.

हेही वाचा-एक वर्षांपासून फरार असणाऱ्या ‘या’ आरोपीला हिसरे येथे सापळा रचून केली अटक; पोलीस निरीक्षक कोकणे व करमाळा पोलिसांची धडक कामगिरी

कोरोना महामारी चे संकट दूर व्हावे’ अशी प्रार्थना करत करमाळा शहरातील चिमुकलीने केले रोजे पूर्ण व कुराणाचे वाचन

लसीचे दोन डोस घेतलेले लोक आता त्यांची दैनंदिन कामे बिनदिक्कत करू शकतात. मात्र, ज्या संघीय, र्जाय, आदिवासी, लोकल बिझनेस, कामाच्या ठिकाणी जिथे मास्क घालणे अनिवार्य केले आहे तिथे मास्क घालावे लागले असे नव्या गाईडलाईनमध्ये म्हटले आहे.

litsbros

Comment here