ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धक्कादायक: एकाच कुटुंबातील आठ जणांचा संशयास्‍पद मृत्यू

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

एकाच कुटुंबातील आठ जणांचा संशयास्‍पद मृत्यू

म्हैसाळ (ता. मिरज) येथे एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परंतु सर्वांचा मृत्यू हा विषबाधेने झाला की त्यांनी आत्महत्या केली, हे मात्र समजू शकले नाही.
म्हैसाळ येथे पशुवैद्यकीय डॉक्टर कुटुंबासहित वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळी उशिरा पर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नव्हता. त्यामुळे दवाखान्यातील कर्मचारी तसेच आजूबाजूला राहणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

म्हैसाळ इथल्या नरवाड रोड जवळ असलेल्या अंबिका नगर चौक आलगत मळ्यात डॉक्टर वनमोरे कुटुंबासह राहात होते. अंबिकानगरमध्येच या कुटुंबाचे एक तर राजधानी कॉर्नर इथं दुसरं घर आहे. सोमवारी सकाळपासून दोन्ही घराचा दरवाजा उघडा नव्हता

पशुवैद्यकीय डॉक्टर त्यांच्यासह कुटुंबातील अन्य कोणीही मोबाईल उचलला नाही. ग्रामस्थांना शंका आल्यानंतर ग्रामस्थाने घरात जाऊन पाहणी केली. त्यावेळी डॉक्टरांच्या कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू तर त्यांच्या भावाच्या घरातील तिघांचा मृत्यू अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सर्वांचा मृत्यू हा विषबाधेतून झाला की त्यांनी आत्महत्या केली, हे मात्र समजू शकले नाही.

मृत्यू झालेल्यामध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय 52), संगीता पोपट वनमोरे (वय 48), अर्चना पोपट वनमोरे ( वय 30), शुभम पोपट वनमोरे (वय 28), माणिक यल्लाप्पा वनमोरे (वय 49), रेखा माणिक वनमोरे (वय 45), आदित्य माणिक वन (वय 15) अनिता माणिक वनमोरे (वय 28) आणि अक्काताई वनमोरे (वय 72) यांचा समावेश आहे.

मिरज ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करण्यात येत आहे.

litsbros

Comment here