ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

शिंदे गटातील ‘या’ आमदाराच्या पत्नीचं निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

शिंदे गटातील ‘या’ आमदाराच्या पत्नीचं निधन

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील सांगलीच्या खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या पत्नीचं अल्पशा आजाराने निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

शोभा बाबर यांच्या जाण्याने खानापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 ऑगस्टला रात्री शोभा बाबर यांची रूग्णालयात जाऊन भेट घेत विचारपूस केली होती. शोभा बाबर यांच्या निधनाच्या बातमीमुळे मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे.  भावपूर्ण श्रद्धांजली, असं एकनाथ शिंदे यांनी ट्विट करताना म्हटलं आहे. 

अनिल बाबर यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीमध्ये शोभाताईंचा मोलाचा वाटा होता. त्यांनी महिला संघटनेचं काम केलं होतं. त्यासोबतच त्यांनी बाबर यांची राजकीय कारकीर्द आणि संसार याचा उत्तम समतोल त्यांनी साधला होता. 

कोण आहेत अनिल बाबर? 

अनिल बाबर हे 1990 मध्ये विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर 1999, 2014 आणि 2019 असे एकूण चारवेळा आमदार  झाले. त्यासोबतच 1991 मध्ये बाबर यांनी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी होते. तर 2001 मध्ये सांगली जिल्हा सहकारी बँकेचं संचालकपदही भूषवलं आहे.

 

litsbros

Comment here