सोलापूर जिल्हा

स्थायी समितीचे माजी सभापती किरण पवार यांचे निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

स्थायी समितीचे माजी सभापती किरण पवार यांचे निधन

सोलापूर ( दि.17): सोलापूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती किरण गंगाधर पवार( भैय्या) यांचं आज मंगळवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते 51 वर्षांचे होते.
अत्यंत कमी वयात नगरसेवक आणि त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापतीपद त्यांनी (2003)अत्यंत कुशलतेंन सांभाळलं. खिलाडू वृत्तीचे असलेले किरण पवार हे खो.खो चे राष्ट्रीय खेळाडू ही होते .त्यांनी विविध क्रीडा, सामाजिक संघटनांवर काम केलं आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील यांचे ते अनेक वर्ष खंदे समर्थक म्हणून कार्यरत होते. थोरला मंगळवेढा तालीम मंडळाचे ते प्रमुख पदाधिकारी होते. अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाचेही ते अनेक वर्ष सदस्य होते. त्यांचा मित्रपरिवार सोलापूर शहर जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र आहे. किरण गंगाधर पवार यांचा पार्थिव छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जुन्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी 5 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार असून बाळे जुना पुणे नाका स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

litsbros

Comment here