करमाळा-माढ्यात पालकमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकी म्हणजे ‘बोलाची कडी आणी बोलाचाच भात’ परिणाम काहीच नाही; वाचा सविस्तर
कुर्डुवाडी(प्रतिनिधी) ; करमाळा व कुर्डुवाडी शहरात दि २४ एप्रिल रोजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संपुर्ण आधिकारी लवाजमासह करमाळा व नंंतर कुर्डुवाडी येथे येवुन कोरोणा विषयी आढावा बैठक घेतली परंतु हि बैठक तेव्हा त्यांच्यावर होत होती त्या टिके मुळेच घेतली होती का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
या वेळी लोकांनी कोरोना विषयी आनेकानी निवेदन दिली. त्यावर कारवाई करण्याची सुचना त्यानी प्रशासनाला केली खरी पण हि आढावा बैठक बोलाची कढी आणी बोलाचाच भात ठरली आहे.
करमाळयात अजूनही व्हेंटिलेटर ची सोय नाही. किती रॅमिडीसीवर येतात आणि कोणाला मिळतात? याचा मेळ नाही. तर कुर्डुवाडी येथिल ग्रामिण रुग्णालयात लसीचा तुटवडा हा विषय विशेष चर्चेचा ठरला परंतु तबल दहा दिवसा नंतर हि परिस्थिति जैसे थे आहे मात्र शेजारील पालकमंत्री यांच्या मतदार संघात मात्र लसीचा तुटवडा नाहि असे सांगण्यात येत आहे. रेमडेसिवर इंजक्शनचा मुद्दा या वेळी मांडला. परंतु आता हि सदर इंजक्शन चा आज हि तुटवडा आसल्याची माहिती येथिल कोविड रुग्णालयातील डॉक्टरां कडुन मिळाली आहे.
कुर्डुवाडी शहरातील बालरुग्ण तज्ञानी पाठवलेले प्रस्ताव २० बेड च्या आटी मुळे अडकले असल्याची माहिती हि पालक मंत्री याना दिली. सदर ग्रमिण भागत सदर अट शितल करण्याचे त्यानी मान्य केले परंतु सदर चे प्रस्ताव आहे त्याच स्थितीत आहेत.
आज ची परिस्थिति आणी आढाव बैठकी नंतर १० दिवसा नंतर काहिच बदलले नाहि आॅक्सीजन बाबतीत येथिल वैधकिय समुहा ने अता प्रांताला निवेदण देवुन मानधरणी केली आहे परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी च्या मध्यस्थी मुळे काहिसा दिलासा हि मिळाला आहे रुग्णालयात रुग्णास घेतानाच आॅक्सजन ची माहिती दिली जाते तर आॅक्सिजन पाहुनच रुग्ण स्विकारले जात आहेत.
माढा येथिल सुरु झालेले अघावत सेंटर आढावा बैठकी पुर्वीच निश्चित झाले होते या व्यतरिक्त कुर्डुवाडी येथे कोविड सेंटर ची मागणी या आढावा बैठकितील महत्वपूर्ण मुद्दा होता परंतु या बाबत हि काहिच करावाई झाली नाहि आ. संजयमामा शिंदे यांनी तसेच रेल्वे कामगार सेनेने या नंतर हि रेल्वे रुग्णालय कोविड सेंटर व्हावे या साठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत.
हेही वाचा- करमाळा तालुक्यातील ‘या’ तीन गावचा ग्रामदैवत यांचा यात्रा उत्सव रद्द
फक्त कोरोनाने नाही तर ‘या’ कारणाने ही वाढत आहे करमाळा शहर व तालुक्यातील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण
पालकमंत्री यांनी घेतलेल्या आढावा बैठकित त्यानी काय साध्य केले किमान नाभिक संघटना , विश्वगामी पत्रकार संघ तसेच जिवनरक्षा समिती ने लेखी निवेदन देवुन केलेल्या मागणी विषयी कारवाई आपेक्षित होती परंतु सध्या उजणी पण्या च्या प्रश्ना मुळे या आढावा बैठकीचा मुद्दाच बाजुला पडला आहे.
Comment here