Uncategorized

कॉलिंग, डेटा प्लान्स 25 टक्क्यांनी महागले, ‘या’ कंपनीच्या ग्राहकांना बसणार फटका

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कॉलिंग, डेटा प्लान्स 25 टक्क्यांनी महागले, ‘या’ कंपनीच्या ग्राहकांना बसणार फटका

मोबाईल  सेवादेणाऱ्या भारती एअरटेलच्या प्रीपेड प्लान्सच्या दरांमध्ये बदलाची घोषणा केली आहे. एअरटेलने प्रीपेड प्लान्समध्ये जवळपास 25 टक्क्यांची वाढ केली आहे. एअरटेलकडून जाहीर करण्यात आलेले दर 26 नोव्हेंबर 2021 पासून लागू होणार आहेत.
Airtel च्या ग्राहकांना महागाईची झळ पोहोचणार आहे. Airtel कडून प्रीपेड प्लान्सच्या दरात वाढ करण्यात आली आहे. कंपनीने हे 25 टक्क्यांनी वाढवले आहेत. याआधी कंपनीने जुलै महिन्यात पोस्टपेड प्लानच्या दरात वाढ केली होती.

आता Airtel च्या 28 दिवसांच्या प्रीपेड प्लान्सची सुरुवात 99 रुपयांनी होणार आहे. म्हणजे या प्लानमध्ये 25 टक्क्यांची वाढ पाहायला मिळते. कंपनीने जुलै महिन्यातच 49 रुपयांचा प्लान आपल्या यादीतून हटवला होता. या प्लान्समधून SMS ची सेवा मिळत नाही.
तुम्हाला SMS सेवाही पाहिजे असेल तर तुम्हाला 149 रुपयांऐवजी आता 179 रुपये खर्च करावे लागतील. या प्लानमध्ये 20 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या बेनिफिट आणि 1GB डेटा आधी 219 रुपयांमध्ये मिळत होता.

मात्र आता या सेवेसाठी 265 रुपये झाली आहे.
Airtel चा पॉप्युलर प्लान 598 रुपयांचा आहे. मात्र आता याची किंमतही वाढली आहे. हा प्लान 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत येतो. या प्लानसाठी आता 719 रुपये खर्च करावे लागणार आहे. डेटा टॉपअप आणि दुसऱ्या प्लान्सच्या दरात 20 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

या प्रीपेड प्लान्सची सुरुवात 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. Reliance Jio आणि Vodafone कडून अजून कोणत्याही प्रकारची दरवाढ अद्याप जाहीर केलेली नाही. या कंपन्यांच्या प्लान्सचे दर देखील बदलण्यात येण्याची शक्यता आहे.

litsbros

Comment here