क्राइममाढासोलापूर जिल्हा

दलित कुटुंबाला घरात घुसून मारहाण; चार आरोपीवर अँट्रोसिटीनुसार गुन्हा दाखल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दलित कुटुंबाला घरात घुसून मारहाण; चार आरोपीवर अँट्रोसिटीनुसार गुन्हा दाखल

भोसरे(प्रतिनिधी) ; माढा तालुक्यातील अरण येथील दलित कुटुंबाला भरदिवसा घरात घुसून लोखंडी पाईप व काठी ने मारहाण केल्याची घटना घडली आहे. चार आरोपीवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात atrocity चा गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी जितेंद्र विलास ताकतैडे यांचे चुलते घराशेजारील रस्त्यावर चालत आसताना आरोपी पांडुरंग राजाराम वाळुजकर याने दुचाकी ने जोरात धडक दिली दिली.

या मध्ये त्यांच्या पायाला व कंबरेला दुखापत झाली. त्या वेळी फिर्याद ने तु गाडी हळू चालवत जा समजत नाही का? असे बोलताच रागाने तेथून निघून गेले. दि 15_10_ 2021 रोजी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी निघाले आसता,त्या ठिकाणी आरोपी पांडुरंग राजाराम वाळुजकर याच्या सोबत मंगेश हरीदास शिंदे यांनी फिर्यादीस तुम्ही फार माजला आहेत.

तुमचा माणूस मेला आहे का. मेला असता तर पुढच बघितल असत असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करून जवळ असलेल्या लोखंडी पाईपने फिर्यादी च्या हातावर व पाठीवर मारहाण करू लागले असता हनुमंत शिंदे व दशरथ शिंदे हे तेथे आले. फिर्यादी मारहाणी च्या भितीने घरात पळून गेला, असता घरात घुसून मारहाण करू लागले.

फिर्यादी ची बहीण चुलती व चुलत भाऊ विशाल भांडण सोडवण्यासाठी गेले असता आरोपी दशरथ शिंदे याने हातातील पाईप ने फिर्यादी च्या बहिणस चुलतीस व चुलतभावास मारहाण केली.

हेही वाचा – माहिती अधिकार कायद्याची १६ वर्षे; काय आहे वस्तुस्थिती; काय आहेत माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या भावना- वाचा विशेष लेख

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करमाळा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा ‘कोविडयोद्धा’ म्हणून सन्मान

सदर प्रकरणातील आरोपी पांडुरंग राजाराम वाळुजकर, मंगेश हरीदास शिंदे, हनुमंत दशरथ शिंदे, दशरथ कुंडलीक शिंदे याच्यावर कलम 452, 324, 323, 504, 506, 34 अनुसूचित जाती जमाती आत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्य़ातील दोन आरोपी फरार असून सदर आरोपीना तात्काळ अटक करून न्याया देण्याची मागणी पीडित कुटुंबाने केली आहे.

आरण या ठिकाणी वंचित बहूजन आघाडी चे सोलापूर जिल्ह्या अध्यक्ष राहुल चव्हाण सर आणी रिपब्लिकन पक्ष चे आधिकारी याणी भेट घेतली आहेत.

litsbros

Comment here