Uncategorized

दहावी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी:परीक्षेचे मूल्यमापन व कार्यपद्धतीचे वेळापत्रक जाहीर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दहावी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी:परीक्षेचे मूल्यमापन व कार्यपद्धतीचे वेळापत्रक जाहीर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता यंदा दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.यानंतर विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा शासन निर्णय शिक्षण विभागाने घेतला. परीक्षा रद्द केल्यावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे होणार? हा प्रश्न सर्वांच्या मानत होता.यावर बोर्डाने शिक्षकांना अंतर्गत मूल्यमापन कार्यपद्धतीच्या सूचना देऊन मूल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

कार्यवाहीचे वेळापत्रक

 मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत मंडळाच्या यू-ट्यूब चॅनलवर प्रशिक्षण – 10 जून 2021 (सकाळी 11 ते दुपारी 1)

अपवादात्मक परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे – 11 जून 2021 ते 20 जून 2021

विषय शिक्षकांनी विषयनिहाय गुणतक्ते वर्ग शिक्षकांकडे सादर करणे – 11 जून 2021 ते 20 जून 2021

वर्ग शिक्षकांनी संकलित निकाल अंतिम करून निकाल शाळेच्या निकाल समितीकडे सादर करणे – 11 जून 2021 ते 20 जून 2021

वर्ग शिक्षकांनी तयार केलेल्या निकालाचे निकाल समितीने परीक्षण व नियमन करून प्रमाणित करणे – 12 जून 2021 ते 24 जून 2021

हेही वाचा-एसटी महामंडळाचे खाजगीकरण रोखा: करमाळा मूलनिवासी संघाचे निवेदन

Breaking News ‘जात चोरली’ खा.नवनीत राणा गोत्यात; जात प्रमाणपत्र रद्द करत २ लाखांचा दंड

 मुख्याध्यापकांनी निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीत भरणे – 21 जून 2021 ते 30 जून 2021

 मुख्याध्यापकांनी निकाल समितीने प्रमाणित केलेले विद्यार्थ्यांचे निकाल व अनुषंगिक स्वाक्षरी प्रपत्रे सिलबंद पाकीटात विभागीय मंडळात जमा करणे. (विभागीय मंडळाच्या नियोजनानुसार) – 25 जून 2021 ते 30 जून 2021

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10वी) परीक्षा निकालाबाबत विभागीय मंडळ व राज्यमंडळ स्तरावरील प्रक्रिया – 3 जुलै 2021 पासून

litsbros

Comment here