महाराष्ट्रशैक्षणिक

महत्त्वाची बातमी:यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा होणार ऑफलाईनच;विद्यार्थ्यांना मिळणार अर्धा तास वाढीव वेळ

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

महत्त्वाची बातमी:यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा होणार ऑफलाईनच;विद्यार्थ्यांना मिळणार अर्धा तास वाढीव वेळ

कोरोनाकाळात दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा होणार याविषयी संभ्रम असतानाच या परीक्षा आता ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे.

यासोबतच गेल्या वर्षभरात ऑनलाईन शिक्षण घेत असल्याने विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाल्यामुळे परीक्षार्थींना अर्धा तास वाढीव वेळ दिला जाणार आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या. की, महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती पाहता परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्या लागणार आहेत, मात्र विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र असणार आहे.


 कोरोनाकाळात विद्यार्थी वर्षभर ऑनलाईन शिक्षण घेत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. हि बाब लक्षात घेऊन दहावी आणि बारावीच्या परीक्षार्थींना अर्धा तास वाढीव वेळ देण्यात येईल.

हेही वाचा-कंदर येथील दोघांवर अँट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल; पण अजून कोणाला ही अटक नाही

वीजबिलाबाबत शेतक-यांनी “या” योजनेचा लाभ घ्यावा; ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले आवाहन

दरम्यान, अर्धा तास वाढीव वेळ दिल्यामुळे परीक्षा आता साडे तीन तासांची असणार आहे. तसेच ऑफलाईन परीक्षा होणार असल्याचे जाहीर केल्यामुळे आता याविषयीचा संभ्रमदेखील दूर झाला आहे.

litsbros

Comment here