ताज्या घडामोडीदेश/विदेश

सावध रहा! देशात येतंय चक्रीवादळ, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सावध रहा! देशात येतंय चक्रीवादळ, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

 सध्या हवामानात मोठा बदल झाला आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात तीन दिवस सर्वदूर पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे पुढील तीन दिवस सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे.
आता जोवाड चक्रीवादळ तयार होत असल्याचा इशारा केंद्रीय हवामान खात्याने दिला आहे. पुढचे काही दिवस समुद्रकिनारी हाय अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यांपासून लांब राहावे, असा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये जोरदार वारे आणि पाऊस यांचा इशारा देण्यात आला आहे.


गुजरातमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पाळीव जनावरांना सखल भागातून हलवण्याचा इशाराही देण्यात आला आहे. थंडी देखील मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.
शेतकऱ्यांनी शेतातील कामे अंदाज बघून करावीत. अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. चाकरमानी वर्गाची अचानक आलेल्या पावसाने चांगलीच पंचाईत झाली. राज्यात पालघर, मुंबई नाशिक, धुळे, नंदुरबार, सांगली या भागात मुसळधार तसेच इतर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.


राज्यात सर्वत्र ढग दाटून आले आहेत. ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यभरात दाणादाण उडाली आहे. नोव्हेंबरमध्ये देखील पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता पुन्हा एकदा डिसेंबरच्या सुरुवातीला राज्यात पुन्हा एकदा पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


यामुळे शेतकरी चिंतेत आहे, बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र असल्याने आंध्र प्रदेश, तामिळनाडूत पाऊस होतो आहे. अशातच राज्यात देखील अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आली आहे.

litsbros

Comment here